चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : 2 फेब्रुवारी 2023 गुरूवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास आकाशात चमकणारी वस्तू दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी आकाशात चमकणाऱ्या वस्तुबाबत वेगवेगळे तर्क लावले. परंतु आकाशात चमकणारी ती वस्तू ही स्पेस ट्रेन (Space train) असल्याची माहिती चंद्रपूरचे खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे. या वस्तुपासून नागरिकांना भीती बाळगण्याचे कारण नाही, नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन त्यांनी पुढारीशी बोलताना केले.
एलन मस्क यांनी अवकाशात सॅटेलाईट सोडले आहेत. वेगवान इंटरनेट सुविधा मिळवण्यासाठी त्यांनी दोन ते तीन सॅटेलाईट सोडले आहेत. याला स्पेस एक्स प्रोग्रॅम असे संबोधण्यात येते. ही शार्टलिंक मालिका आहे. गुरूवारी रात्री साडेसातच्या सुमारास अचानक लांब आकाराची वस्तू चंद्रपुरात आकाशात चमकताना आढळून आली. ठिकठिकाणी नागरिकांनी ती दिसली.
काही महिन्यांपूर्वी आकाशातून स्फोटक् रिंग व गोळे चंद्रपूर जिल्ह्यात ठिकठिकणाणी आढळहून आले होते. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये अवकाशात दिसणाऱ्या वस्तूंबाबत कुतूहल व भीती कायम आहे. आज जेव्हा ही लांब स्वरूपाची वस्तू आकाशात आढळून आली. तेव्हा नागरिकांनी मागील घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या. त्या प्रकारची ही वस्तू आकाशातून जमिनीवर तर पडणार नाही (Space train) अशी भीती निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांनी धुमकेतू किंवा अन्य वस्तू असल्याचे तर्कवितर्क लावले होते. शिवाय अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये ते दृश्य व व्हिडीओ स्वरूपात कैद केले.
नागरिकांमध्ये भीती निर्माण झाल्याने चंद्रपूरचे खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी, या खगोलीय घटनेबाबत अभ्यासपूर्ण माहिती पुढारीशी बोलताना दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार एलन मस्क यांनी स्वत:ची अवकाशात फास्ट इंटरनेट (Space train) सुविधा निर्माण करण्याकरीता काही सॅटेलाईट अवकाशात सोडले आहेत. दोन ते तीन दिवसांपूर्वी एक सॅटेलाईट सोडण्यात आला. हे सॅटेलाईट एकामागे एक असल्याने त्याला स्पेस ट्रेन असे संबोधले जाते.
गुरूवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास चंद्रपूर व महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात ही स्पेस ट्रेन (Space train) अवकाशात स्पष्टपणे आढळून आली. सुर्यप्रकाश त्यावर पडत असल्याने ती वस्तू चमकत होती. ती पाचशे कि.मी. च्यावर आकाशात होती. दरम्यान आज (शुक्रवार) अवकाशात अस्पष्ट स्वरूपात ही स्पेस ट्रेन दिसणार आहे. आज महाराष्ट्रात दिसलेली ही स्पेस ट्रेन ही विदर्भाच्या मध्यभागी होती. ही अवकाशीय घटना आहे. त्यामुळे यापासून कोणतीही भीती नाही. नागरिकांनी या घटनेबाबत घाबरू नये किंवा भीती बाळगण्याचे कारण नाही अशी माहिती खगोलीय अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी पुढारीशी बोलताना दिली.
हेही वाचा :