Ashwin record in Test : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत अश्विनला ‘हा’ विक्रम नावावर करण्याची संधी | पुढारी

Ashwin record in Test : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत अश्विनला 'हा' विक्रम नावावर करण्याची संधी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील कसोटी मालिकेला ९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहेत. या मालिकेत ४ सामने होणार आहेत. पहिला सामना नागपूरच्या स्टेडियमवर खेळवण्यात येईल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत रविचंद्रन अश्विनला नवा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. (Ashwin record in Test)

रवीचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण १८ सामने खेळले असून, यामध्ये त्याने ८९ विकेट्स पटकावल्या आहेत. आगामी कसोटी मालिकेत अश्विन ऑस्ट्रेलियन संघाला आपल्या फिरकीने नाचवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिवाय या मालिकेदरम्यान अश्विन एक अनोखा विक्रम आपल्या नावावर करण्‍यासाठी सज्‍ज झाला आहे. (Ashwin record in Test)

जलद ४५० विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरणार

आर. अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये ४५० विकेट घेण्‍यापासून फक्त १ विकेट दूर आहे. ९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यात अश्विनने १ विकेट पटकावल्यास तो कसोटी क्रिकेटमध्ये ४५० विकेट्सचा टप्पा पार करणार आहे. तसेच  कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत जलद गतीने ४५० विकेट्स पटकावणारा जगातील दुसरा गोलंदाज ठऱणार आहे. अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये ८८ सामने खेळत ४४९ विकेट्स पटकावल्या आहेत. (Ashwin record in Test)

कसोटी क्रिकेटमध्ये यापूर्वी मुथय्या मुरलीधरनने सर्वांत जलद गतीने ४५० विकेट्स पटकावल्या आहेत. मुरलीधरनने ८० कसोटी सामन्यांमध्ये ४५० विकेटस् घेतल्या होत्या. अनिल कुंबळे यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ४५० बळी घेण्यासाठी ९३ सामने खेळले होते. शेन वॉर्न यांनी यांनी हा टप्पा पार करण्यासाठी १०१ सामने खेळले होते. (Ashwin record in Test)

हेही वाचंलत का?

Back to top button