

वर्धा, पुढारी वृत्तसेवा : वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारती बाहेरील भागात केबलला बुधवारी रात्री अचानक आग लागली. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात एकच धावपळ झाली. रुग्णालयातील कर्मचारी आणि स्थानिकांनी धाव घेत तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले.
समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारती बाहेर असलेल्या केबलला अचानक आग लागली. आगीमुळे एकच भडका उडाला. आग लागल्याच लक्षात येताच रुग्णालयातील कर्मचारी, नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
अग्निशमन सिलिंडरच्या साहाय्याने काही वेळात आग विझवण्यात आली. आग लागल्याचे दिसताच एकच धावपळ झाली होती. या भागात नवीन बांधकामही सुरू आहे. शॉर्ट सर्कीटमुळं आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळाल्याने पुढील होणारा अनर्थ टळला. आगीच्या घटनेमुळे वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. आगीवर नियंत्रण मिळाल्यानंतर पर्यायी व्यवस्था करून वीज पुरवठा सुरळीत केल्या गेला.
हेही वाचा :