परीक्षा, निकालाच्या भोंगळ कारभाराविरूद्ध सोलापूर विद्यापीठात ‘अभाविप’चे आंदोलन | पुढारी

परीक्षा, निकालाच्या भोंगळ कारभाराविरूद्ध सोलापूर विद्यापीठात 'अभाविप'चे आंदोलन

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेच्या निकालात अनेक त्रुटी आढळून आले आहेत. यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाला वारंवार विद्यार्थांनी तसेच संघटनांनी निवेदन देऊन देखील चूका दुरुस्ती करण्यात आले नाहीत, असा आराेप करत  अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने विद्यापीठ शुद्धीकरण आंदोलन केले.

यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्‍हणाले की,  मागील काही दिवसापासून सोलापूर विद्यापीठ परीक्षा विभाग कायम चर्चेत आले आहे. अनेक चुका परीक्षा विभागाकडून सतत होत असल्याने याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना होत आहे. परीक्षा संपूनही दोन महिने लोटले तरी अद्याप निकालाचे सत्र सुरूच आहेत. ओ एम आर सिस्टीम प्रणाली द्वारे आठ ते दहा दिवसात निकाल जाहीर करण्याची शास्वती देणाऱ्या सोलापूर विद्यापीठ परीक्षा विभागाची भोंगळ कारभार समोर आला आहे.

यावेळी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस  यांच्या दालनसमोर अचानकपणे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते गेले. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच प्रतिकात्मक होम हवन करत अभावीपच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ शुद्धीकरण आंदोलन केले.

हेही वाचा  :

Back to top button