बोरीभडक येथे लॉजींग वेश्याव्यवसायावर कारवाई; मालकासह ६ आरोपींवर गुन्हा दाखल

file photo
file photo
Published on
Updated on

राहू; पुढारी वृत्तसेवा: पुणे-सोलापूर महामार्गावर बोरीभडक, (ता.दौंड. जि.पुणे) येथील नक्षत्र लॉज येथे पुणे ग्रामीण पोलीसांच्या विशेष पथकाने छापा टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्या ४ तरुणींची सुटका केली. लॉजचे मालक व व्यवस्थापक असे एकूण ६ आरोपींवर पिटा कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक विभाग (ए.एच.टी.यु.) चे पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान यांनी दिली. पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी जिल्हयातील अवैध धंदयावर कारवाई करण्यासाठी ए.एच.टी.यु. विभागाचे पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान, पोलीस उपनिरीक्षक सुधीर घुले, महेश गायकवाड, जितेंद्र शेवाळे, महिला हवालदार ज्योती बांभळे, निर्मला ओव्हाळ यांचे पथक नेमून त्यांना अवैध वेश्याव्यवसाय धंदयाची माहिती काढून कारवाई करणेबाबत आदेश दिलेले होते.

या पथकाने १२ ऑक्टोबर रोजी यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गावर कासुर्डी टोलनाका येथे येवून गोपनीय माहिती काढत असताना त्यांना उरुळी कांचन खेडेकरमळा नजीक बोरीभडक, (ता.दौंड जि.पुणे) गावाच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गालगतचे नक्षत्र लॉज येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे खात्री करण्यासाठी पोलीस पथकाने नक्षत्र लॉज या ठिकाणी बनावट गिऱ्हाईक पाठविले. तेथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्री पटल्यानंतर त्या ठिकाणी सापळा रचून सायंकाळी अचानक छापा टाकला.

त्यावेळी या ठिकाणी लॉजवर वेश्या व्यवसाय चालविणारे किर्तिश सुrahu news

pune news

धाकर हेगडे (शेट्टी) (वय ३६ वर्षे रा.बोरीभडक, चंदनवाडी ता.दौंड जि.पुणे. मुळ रा.मिनगुंडी कंपाउंड, उडपी, कर्नाटक) रुपेश किसन झुनगारे (वय ३३ वर्षे रा.सांगवी ता.भोर जि.पुणे) तसेच ४ पिडीत तरुणी मिळून आलेल्या आहेत. किर्तिश हेगडे (शेट्टी) व रुपेश झुनगारे यांना अटक करण्यात आलेली असून लॉजचा मालक किशोर ज्ञानेश्वर आतकिरे (रा.बोरीभडक ता.दौंड जि.पुणे) व त्यांचे आणखीन ३ साथीदार असे संगनमताने पिडीत तरुणींना पैशाचे अमिष दाखवून नक्षत्र लॉज येथे त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे निष्पन्न झालेने त्या ६ आरोपी विरुध्द यवत पोलीस स्टेशनला अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कायदा व भारतीय दंड विधान कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयात लॉजवर मिळून आलेल्या २ आरोपींना अटक करण्यात आलेली असून फरारी आरोपींचा शोध चालू आहे.

लॉजवर मिळून आलेल्या ४ पिडीत तरुणींची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आलेली आहे. वेश्याव्यवसायाचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून त्यामध्ये आणखीन कोणी सहभागी आहे काय? याबाबत तसेच गुन्हयाचा पुढील अधिक तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार हे करीत आहेत. सदरची कारवाई ही पुणे जिल्हयाचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती विभाग अपर पोलीस अधीक्षक श्री.मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान, पोलीस उपनिरीक्षक सुधीर घुले, महेश गायकवाड, जितेंद्र शेवाळे, महिला हवालदार ज्योती बांभळे, निर्मला ओव्हाळ यांचे पथकाने केलेली आहे.

लाँजमालक सराईत गुन्हेगार
यातील आरोपी लॉज मालक किशोर आतकिरे हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी यवत पोलीस स्टेशनला दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्हयात तो सध्या जामीनावर सुटलेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news