उपराष्ट्रपतीचा नागपूर दौरा; नागपूर विद्यापीठाला देणार भेट

उपराष्ट्रपतीचा नागपूर दौरा; नागपूर विद्यापीठाला देणार भेट
Published on
Updated on
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या शुक्रवारी (दि.४)  नागपूरच्या एकदिवसीय दौऱ्यावर येत आहेत. उद्या दुपारी ३ वाजता त्यांचे शहरात आगमन होणार असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव सोहळ्यात तसेच राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या (एनएडीटी) वार्षिक 'प्रणिती' कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. त्यांच्या दौऱ्यासाठी नागपूर सज्ज झाले आहे. आज उपराष्ट्रपती यांच्यासह मान्यवरांच्या काफ़िल्याची रंगीत तालीम झाली.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या स्वागतासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही उद्या नागपूरमध्ये आगमन होणार आहे.
उपराष्ट्रपती  दुपारी ३.३० वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ५.३० वाजता ते राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या वार्षिक प्रणिती कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. एनएडीटीमध्ये सायंकाळी ५.३० नंतर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय महसूल सेवेचे प्रशिक्षण केंद्र असणाऱ्या या प्रबोधिनीमध्ये ते जवळपास तीन तास असतील. रात्री ९.२० च्या दरम्यान ते दिल्लीकडे प्रयाण करतील. एकंदर सुमारे सहा तास उपराष्ट्रपती नागपूरात असणार आहेत. कार्यक्रमस्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त असून दोन्ही कार्यक्रम निमत्रितांसाठी आहेत.

राज्यपाल रमेश बैस

 दरम्यान, राज्यपाल रमेश बैस यांचे उद्या (दि. ४) दुपारी १२.३० वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर आगमन होणार आहे. रायपूर येथून ते नागपूर येथे रेल्वेने पोहचतील. दुपारी १२.३५  ला ते राजभवनला पोहचतील या दोन्ही कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन मुक्काम करतील.
      हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news