Farmers Loan Waiver | कर्जमाफीच्या यादीत नाव, केवायसीही पूर्ण; तरीही ३ शेतकरी लाभापासून वंचित

मसला पेन येथील स्टेट बँकेचा कारभार; दापुरी व केशवनगरच्या शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
Risod Farmers Complaint
रिसोड तालुक्यातील दापुरी व केशवनगर येथील या शेतकऱ्यांनी मसला पेन येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेकडून लाभ मिळण्यास विलंब होत असल्याची तक्रार केली Pudhari
Published on: 
Updated on: 

Risod Farmers Complaint

वाशिम : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या लाभार्थी यादीत नाव समाविष्ट होऊनही आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही तीन शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. रिसोड तालुक्यातील दापुरी व केशवनगर येथील या शेतकऱ्यांनी मसला पेन येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेकडून लाभ मिळण्यास विलंब होत असल्याची तक्रार केली आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर सरनाईक, शामसुंदर खोटे आणि गजानन लोखंडे यांनी २६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन तातडीने न्याय देण्याची मागणी केली.

निवेदनानुसार, तिन्ही शेतकऱ्यांची नावे कर्जमाफी योजनेच्या पहिल्या यादीत समाविष्ट आहेत. ज्ञानेश्वर सरनाईक यांनी २७ जुलै, गजानन लोखंडे यांनी २८ जुलै, तर शामसुंदर खोटे यांनी २९ जुलै २०२६ रोजी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली. मात्र, त्यानंतरही त्यांच्या कर्ज खात्यांमध्ये कर्जमाफीचा लाभ जमा झालेला नाही.

Risod Farmers Complaint
Farmers Loan Waiver: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना 5,000 रुपये मिळणार; मुख्यमंत्र्यांचे आदेश, कर्जमाफीच्या चौथ्या यादीबाबत मोठी अपडेट

बँकेकडून ठोस माहिती मिळेना

कर्जमाफी रखडल्याबाबत शेतकऱ्यांनी मसला पेन येथील स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकांकडे वारंवार विचारणा केली. मात्र, लाभ का मिळाला नाही, याबाबत समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे विचारणा करण्याचा सल्ला बँकेकडून देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

पीककर्जाचा मार्गही अडला

अपुऱ्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून, शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत शासनाच्या योजनेत पात्र ठरूनही कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याने आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच नवीन पीककर्ज घेण्यातही अडचणी येत असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली.

Risod Farmers Complaint
Farmer Loan Waiver | शेतकरी 'कर्जमुक्ती'ची चौथी यादी जाहीर; वाशिम जिल्ह्यातील ३५६ गावांतील १,८२३ शेतकरी पात्र

जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बँकेला आवश्यक निर्देश देऊन प्रलंबित कर्जमाफीचा लाभ तातडीने खात्यात जमा करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी ज्ञानेश्वर सरनाईक, शामसुंदर खोटे आणि गजानन लोखंडे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news