Farmer Loan Waiver | शेतकरी 'कर्जमुक्ती'ची चौथी यादी जाहीर; वाशिम जिल्ह्यातील ३५६ गावांतील १,८२३ शेतकरी पात्र

आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे आवाहन
farmer loan waiver
farmer loan waiverpudhari photo
Published on: 
Updated on: 

Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana

वाशिम : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील १ हजार ८२३ पात्र शेतकऱ्यांची चौथी यादी २२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमधील ३५६ गावांतील शेतकऱ्यांचा या यादीत समावेश आहे. पात्र लाभार्थ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेली, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पीक कर्जे तसेच पुनर्गठित व फेरपुनर्गठित कर्जांसाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे.

farmer loan waiver
Washim News : ऐन पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर वाशिममध्ये हजारो लिटर पाण्याची नासाडी!

५० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाआयटीकडून ऑनलाइन संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँका आणि खासगी बँकांनी या प्रणालीवर एकूण ८१ हजार ३५६ थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे.

यापूर्वीच्या याद्यांमधील आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या ५० हजार ६४१ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये आतापर्यंत ४४६ कोटी ९८ लाख रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे.

रिसोड तालुक्यात सर्वाधिक लाभार्थी

चौथ्या यादीतील तालुकानिहाय लाभार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

  • रिसोड : ५४० शेतकरी

  • कारंजा : ३९४ शेतकरी

  • वाशिम : ३०९ शेतकरी

  • मालेगाव : २७१ शेतकरी

  • मानोरा : १९७ शेतकरी

  • मंगरुळपीर : ११२ शेतकरी

या यादीतील पात्र शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या गाव चावडी, ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची कार्यालये आणि संबंधित बँक शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

farmer loan waiver
Washim former PSI bribery conviction- लाचखोर तत्कालीन पोलीस उपनिरीक्षकाला तीन वर्षे सक्तमजुरी

आधार प्रमाणीकरणासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक?

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी असणे आवश्यक आहे. पात्र लाभार्थ्यांनी आपला विशिष्ट क्रमांक, आधार क्रमांक, कर्जखात्याचे पासबुक आणि बँक खात्याचे पासबुक सोबत घेऊन आपले सरकार सेवा केंद्रात जावे. तेथे आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी.

आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर मंजूर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाणार आहे. त्यामुळे चौथ्या यादीतील सर्व पात्र शेतकऱ्यांनी विनाविलंब आधार प्रमाणीकरण पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि जिल्हा उपनिबंधक लटपटे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news