Washim Municipal Council news | नगरपरिषदेची अतिक्रमणाविरोधातील मोहीम केवळ कागदोपत्री?

शहरातील नागरिकांचा संतप्त सवाल...
Washim Municipal Council news | नगरपरिषदेची अतिक्रमणाविरोधातील मोहीम केवळ कागदोपत्री?
Published on
Updated on

अजय ढवळे

वाशिम : शहरातील अतिक्रमणाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असताना वाशिम नगर परिषदेची अतिक्रमण हटाव मोहीम केवळ फाईल, नोटिसा आणि बैठकींपुरतीच मर्यादित राहिल्याची चर्चा शहरभर रंगू लागली आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी अतिक्रमण हटविण्याच्या घोषणा केल्या जातात, नोटिसा बजावल्या जातात, पंचनामे केले जातात; मात्र प्रत्यक्षात शहरातील अनेक प्रमुख रस्ते, चौक, फूटपाथ आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे जैसे थे असल्याचे चित्र आहे.

Washim Municipal Council news | नगरपरिषदेची अतिक्रमणाविरोधातील मोहीम केवळ कागदोपत्री?
Sambhajinagar encroachment drive viral video : अतिक्रमण कारवाईपूर्वी 24 तासांची पूर्वसूचना द्या!

शहरातील नागरिकांना दररोज वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या, पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागेचा अभाव आणि अपघाताच्या धोक्याचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी अतिक्रमणामुळे आपत्कालीन सेवांनाही अडथळा निर्माण होत असून चौकात अपुऱ्या जागे मुळे महापुरुषाच्या पुतळ्याच्या कथड्याला देखील वाहणाच्या धडका लागून नुकसान होत असल्याची नागरिकांच्या तक्रारी आहेत. तरीही संबंधित यंत्रणा ठोस कारवाई करण्यास असमर्थ ठरत असल्याचे दिसून येत आहे.

Washim Municipal Council news | नगरपरिषदेची अतिक्रमणाविरोधातील मोहीम केवळ कागदोपत्री?
Paranda Encroachment Action : परंड्यातील अतिक्रमणांवर नगर परिषदेचा हातोडा

नगर परिषदेकडून अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र नोटीस दिल्यानंतर पुढे काय कारवाई झाली, किती अतिक्रमणे हटविण्यात आली, किती प्रकरणांवर दंडात्मक कारवाई झाली याबाबत स्पष्ट माहिती समोर येत नसल्याने नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Washim Municipal Council news | नगरपरिषदेची अतिक्रमणाविरोधातील मोहीम केवळ कागदोपत्री?
jalna News : शहरातील ४० अतिक्रमणे हटवली

शहरातील अनेक भागांमध्ये वर्षानुवर्षे अतिक्रमणे कायम आहेत. काही ठिकाणी कारवाईचे नाटक करून काही दिवसांत पुन्हा अतिक्रमणे उभी राहत असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे "कारवाई होते की केवळ कारवाईचे दाखले तयार होतात?" असा थेट प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.

Washim Municipal Council news | नगरपरिषदेची अतिक्रमणाविरोधातील मोहीम केवळ कागदोपत्री?
Shevgaon Encroachment Drive: शेवगाव अतिक्रमण हटाव मोहिमेवर संताप; पुनर्वसनाशिवाय कारवाईमुळे व्यावसायिक आक्रमक

शहर सौंदर्यीकरण, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेच्या गप्पा मारणाऱ्या प्रशासनाने सर्व प्रकारच्या अतिक्रमणांवर समान आणि निष्पक्ष कारवाई करून शहराला अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. "कागदोपत्री कारवाई की अतिक्रमणधारकांना अभय?"...वाशिम नगर परिषदेच्या भूमिकेवर नागरिकांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न उपस्थित.

⚠️ प्रश्न अनुत्तरितच...

👉 अतिक्रमण हटविण्याच्या कारवाया प्रत्यक्षात किती झाल्या?

👉 नोटिसा देऊन प्रशासन मोकळे तर होत नाही ना?

👉 प्रभावशाली अतिक्रमणधारकांवर कारवाई का होत नाही?

👉 शहरातील फूटपाथ नागरिकांसाठी की अतिक्रमणधारकांसाठी?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news