Shevgaon Encroachment Drive: शेवगाव अतिक्रमण हटाव मोहिमेवर संताप; पुनर्वसनाशिवाय कारवाईमुळे व्यावसायिक आक्रमक

शेकडो टपरीधारक उघड्यावर; प्रशासनाच्या कारवाईवर नाराजी, पुनर्वसनाची ठोस मागणी जोरात
JCB
JCBPudhari
Published on
Updated on

बोधेगाव: शेवगाव शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत शेकडो लहान व्यावसायिकांच्या टपऱ्या व व्यवसायांवर बुलडोझर फिरला. मात्र, त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे. प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याची घाई दाखवली, पण या कारवाईमुळे उघड्यावर आलेल्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल आता शहरातून उपस्थित होत आहे.

JCB
Rahuri Jail Liquor Smuggling: राहुरी उपकारागृहात जेवणातून दारूची तस्करी; सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न

याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते अरुण पाटील लांडे यांच्या संपर्क कार्यालयात अतिक्रमणग्रस्त व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्त्यांची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत आ. मोनिका राजळे यांची लवकरच भेट घेऊन अतिक्रमणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ठोस निर्णय घेण्याची मागणी करण्याचा निर्धार करण्यात आला.

JCB
ZP School Teacher Surplus: झेडपी शाळांमध्ये पटसंख्या घट; 650 शिक्षक अतिरिक्त, भविष्यात अडचण वाढण्याची शक्यता

बैठकीत प्रशासनाच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. अतिक्रमण हटवायचे असेल, तर आधी पर्यायी व्यवस्था करणे ही शासनाची जबाबदारी आहे. वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्या गरीब टपरीधारकांना एका दिवसात रस्त्यावर आणणे हा कोणता विकास? असा सवाल उपस्थितांनी केला.

JCB
Rashin Hoarding Accident: राशीनमध्ये वादळी वाऱ्यात लोखंडी होर्डिंग कोसळून तरुणाचा मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

जिल्हा परिषद शाळेजवळील रखडलेल्या व्यापारी संकुलाच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्यात यावी, तसेच कोरोनेशन हॉल, प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर आणि इतर शासकीय जागांवर व्यापारी संकुले उभारून अतिक्रमणग्रस्तांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.

मोठमोठ्या बेकायदेशीर बांधकामांकडे डोळेझाक आणि गरिबांच्या टपऱ्यांवर बुलडोझर, हा न्याय नाही, अशी भावना अनेक व्यावसायिकांनी व्यक्त केली. शहराच्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली गरिबांच्या पोटावर लाथ मारण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही, असा इशाराही बैठकीत देण्यात आला.

JCB
Ahilyanagar Storm: वादळी पावसाचा अहिल्यानगरला तडाखा; 40 ठिकाणी झाडे कोसळली, रात्रभर वीजपुरवठा विस्कळीत

या वेळी डॉ. नीरज लांडे पाटील, दत्ता फुंदे, रवी सुरोसे, किरण काथवटे, चंद्रकांत कर्डक, बापू धनवडे, गणेश शहाणे, गणेश रणखांब, मुन्ना बोरुडे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि अतिक्रमणग्रस्त व्यावसायिक उपस्थित होते.

टपऱ्या हटवल्या; संघर्ष नाही

पुनर्वसनाशिवाय हा प्रश्न शांत होणार नाही, असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. आता आमदार यांच्याकडून अतिक्रमणग्रस्तांना दिलासा मिळतो की हा प्रश्न आणखी पेटतो, याकडे शेवगावकरांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news