Washim Burglary Case | २५ दिवसांत घरफोडीचा उलगडा; ४.५४ लाखांचा ऐवज जप्त, आरोपीला पुण्यातून अटक

येडशी (ता. मंगरुळपीर) येथील घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून छडा
Washim Police Crack Theft Case
घरफोडी प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २५ दिवसांत करत आरोपीला अटक केलीPudhari
Published on
Updated on

Washim Police Crack Theft Case

वाशिम : येडशी (ता. मंगरुळपीर) येथे झालेल्या घरफोडी प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २५ दिवसांत करत आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे चोरीस गेलेला ४ लाख ५४ हजार रुपयांचा संपूर्ण मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला आहे.

११ मे २०२६ रोजी रात्री येडशी येथील अश्विनी प्रवीण तायडे यांच्या घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते. या प्रकरणी १२ मे रोजी मंगरुळपीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Washim Police Crack Theft Case
Illegal Liquor Raid Washim | अवैध गावठी हातभट्ट्यांवर पोलिसांची धडक कारवाई; ५ दिवसांत ७८ छापे, १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. तपासादरम्यान येडशी येथील रहिवासी संघदीप चंदू वानखडे याच्यावर संशय बळावला.

गुन्हा केल्यानंतर आरोपी पुण्यात फरार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे विशेष पथक तातडीने पुण्याकडे रवाना झाले. तेथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपीने घरफोडीची कबुली दिली.

Washim Police Crack Theft Case
Washim crime | दारू विक्री करणाऱ्या ढाब्यावर छापे ; १२ जणांवर कारवाई, ३.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

चोरीतील दागिने शेलूबाजार येथील दोन सोनारांना विकल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी शेलूबाजार येथे कारवाई करून पंचनामा करत ५२ ग्रॅम सोने आणि ४२ ग्रॅम चांदी असा एकूण ४ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Washim Police Crack Theft Case
Washim Municipal Council news | नगरपरिषदेची अतिक्रमणाविरोधातील मोहीम केवळ कागदोपत्री?

अवघ्या २५ दिवसांत घरफोडीचा उलगडा करून चोरीस गेलेला शंभर टक्के ऐवज परत मिळवण्यात पोलिसांना यश आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, मंगरुळपीरचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके, पोलीस उपनिरीक्षक निलेश जाधव तसेच महेश वानखडे, गोपाल चौधरी आणि शाम इंगळे यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news