Washim crime | दारू विक्री करणाऱ्या ढाब्यावर छापे ; १२ जणांवर कारवाई, ३.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपींविरुद्ध वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद
Washim crime | दारू विक्री करणाऱ्या ढाब्यावर छापे ; १२ जणांवर कारवाई, ३.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त
Published on
Updated on

वाशिम : उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने ३ जून २०२६ रोजी वाशिम शहर, वाशिम ग्रामीण आणि मालेगाव परिसरात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम राबवली. या कारवाईत एकूण १२ आरोपींविरुद्ध ५ गुन्हे दाखल करण्यात आले असून, तब्बल ३ लाख ५५ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे आणि अपर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे विशेष पथक व आर.सी.पी. पथकाने केली.

Washim crime | दारू विक्री करणाऱ्या ढाब्यावर छापे ; १२ जणांवर कारवाई, ३.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त
Washim Crime : वाशिममध्ये अवैध दारू अड्ड्यांवर पोलिसांची धडक कारवाई; जिल्ह्यातून ६ लाखांहून अधिकचा साठा जप्त

शहरात पाच जणांना अटक

वाशिम शहर पोलीस स्टेशन अंतर्गत स्वागत लॉन परिसरात दोन इसम स्कुटीवरून देशी दारूची वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी या कारवाईत ६८०० रुपयांची देशी दारू, ८०,००० रुपयांची स्कूटी आणि २०,३०० रुपयांचे मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चंद्रकांत कैलास राऊत, विष्णू पवार, आदित्य गजानन गायकवाड, आशिष गजानन गायकवाड आणि उमेश ढवळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Washim crime | दारू विक्री करणाऱ्या ढाब्यावर छापे ; १२ जणांवर कारवाई, ३.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त
Dhule Crime : धुळ्यात पोलिसांची मोठी कारवाई; ४४ लाखांची अवैध विदेशी दारू जप्त, कंटेनरसह चालक जेरबंद

ग्रामीणमध्ये हॉटेल्सवर धाड

वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाशिम-मालेगाव रोडवरील 'शिवनेरी' आणि 'युवराज' हॉटेलवर पोलिसांनी धाड टाकली. यात ज्ञानेश्वर व. गोरे याच्याकडून १७,६०० रुपयांची देशी-विदेशी दारू, तर शंकर द. गोरे याच्याकडून १५,८०० रुपयांचा मुद्देमाल (दारू आणि मोबाईल) जप्त करण्यात आला. या दोन्ही आरोपींविरुद्ध वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

Washim crime | दारू विक्री करणाऱ्या ढाब्यावर छापे ; १२ जणांवर कारवाई, ३.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त
Latur Crime | जळकोट पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध धडक कारवाई; दोन हायवा टिपरसह 50.50 लाखांचा मुद्देमाल जप्त!

मालेगावमध्ये हातभट्टीवर कारवाई

मालेगाव तालुक्यातील अमाणी गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत गावठी हातभट्टी आणि मोहामाच साठवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. घटनास्थळावरून २२५ किलो मोहामाच सडवा, १५० किलो मोहफुले, गावठी दारू आणि मोटारसायकल असा १,३६,५५० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणात रवी संतोष तिवले, संतोष नामदेव तिवले, कमलाबाई देवीदास जाधव, धनंजय राजाराम जाधव आणि रेखाबाई सुखदेव झ्याटे या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल, सपोनि दिनेश शिरेकार यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी हरिभाऊ कालापाड, अरविंद राठोड, स्वप्नील शेळके, अशोक कोकाटे, संदीप मळघणे आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आर.सी.पी. पथकाने यशस्वीपणे पार पाडला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news