वाशीम : कुऱ्हाडीने घाव घालून मित्राचा निर्घृण खून

file photo
file photo
Published on
Updated on

वाशीम; पुढारी वृत्तसेवा : एकाच ठिकाणी सोबत काम करणाऱ्या दोन मित्रात काही कारणावरून वाद झाला. याचा राग मनात धरून एका मित्राने घरात जेवण करीत असलेल्या मित्राच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घालून मित्राची निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना कारंजा तालुक्यातील टाकळी गावात शनिवारी (दि.१७) रात्री घडली. संतोष घोरमोडे असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आरोपी पसार झाला असून कारंजा ग्रामीण पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, टाकळी गावात राहणारे संतोष घोरमोडे व त्याचा मित्र एकाच ठिकाणी काम करीत होते. शनिवारी (दि.१७) रात्री दोघेजण एकत्रित दोघे दारू पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी त्यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. त्यानंतर संतोष घोरमोडे आपल्या घरी येऊन जेवण करीत असताना त्याच्या मित्राने घरात येऊन त्याच्यावर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने संतोषचा जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही, कारंजा पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

दारू विक्रीतून गावोगावी वाद ; राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दुर्लक्ष

वाशीम जिल्ह्यात बहुतांश गावात राजरोसपणे अवैध दारू विक्री केली जाते. यातून किरकोळ वाद उफाळून आल्याने हाणामारीच्या घटना घडत आहेत. दारुमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या अवैध दारू विक्रीवर कुठलीच कारवाई होत नसल्याने जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news