परभणी: ट्रेलरची दुचाकीला धडक; पत्नी ठार, पती गंभीर जखमी | पुढारी

परभणी: ट्रेलरची दुचाकीला धडक; पत्नी ठार, पती गंभीर जखमी

जिंतूर, पुढारी वृत्तसेवा : परभणी रस्त्यावरील साई मैदानासमोर ट्रेलरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पत्नीचा मृत्यू झाला. तर पती गंभीर जखमी झाला. ही दुर्दैवी घटना आज (दि.१८) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील परभणी रस्त्यावर साई मैदानासमोर भरधाव ट्रेलरने (एम एच 43 यु 4332) दुचाकीला (एमएच 38 वाय 6494) जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार भानुदास नामदेव ठाकरे (वय ५१), रेणुका भानुदास ठाकरे (वय ४६, दोघे रा. रामेश्वर) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काजळे सहकारी सतीश ठोंबरे, संतोष शिंदे यांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तिथे डॉ. देविदास गरड यांनी प्राथमिक उपचार केले. रेणुका ठाकरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा 

Back to top button