Gor Banjara Sahitya Sammelan: नागपूरमध्ये जानेवारीत होणार पाचवे अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलन

२०१४ मध्ये साहित्य संघाचे दुसरे संमेलन नागपूरात झाले होते, तिसरे संमेलन वाशीम ला तर चौथे साहित्य संमेलन तेलंगणा राज्याची राजधानी हैद्राबाद येथे पार पडले होते.
Gor Banjara Sahitya Sammelan
Gor Banjara Sahitya Sammelanpudhari
Published on: 
Updated on: 

वाशीम दि.१६: (पुढारी वृत्तसेवा)

समाजाचा सांस्कृतीक वारसा,इतिहासाचे जतन, दर्जेदार साहित्याची निर्मिती,जास्तीत जास्त युवा साहित्यीक तयार व्हावे, मौखीक भाषाचे रूपांतर लेखणीत व्हावे, समाजाच्या कला, बोलीभाषा, पेहराव, समाज एकसंघ रहावा या उदात्त हेतूने यंदाचे ५वे अ.भा.गोर बंजारा साहित्य संमेलन नागपूरात होणार असल्याची माहिती गोर बंजारा साहित्य संघ, भारतचे राष्ट्रीय संघटक मनोहर चव्हाण यांनी दिली आहे.

Gor Banjara Sahitya Sammelan
100th Marathi Literary Conference: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शंभरावे मराठी साहित्य संमेलन साधेपणाने होणार

नागपूर चळवळींचे ठिकाण

नागपूर हे महाराष्ट्राचे चळवळीचे एकमेव ठिकाण आहे. येथून पेरल्या जाणाऱ्या गोष्टी अख्या भारताच्या कानाकोपऱ्यात पेरल्या जातात. तसेच नागपूर शहर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे येणाऱ्या पाहुण्यांना आपला प्रवास सुलभ व्हावा, याकरीता नागपूर शहर निवडल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

Gor Banjara Sahitya Sammelan
Nanded News | लोहा येथे १० ऑक्टोबररोजी तिसरे जिल्हा मराठी साहित्य संमेलन

दुसरे संमेलन देखील नागपुरातच झाले होते

२०१४ मध्ये साहित्य संघाचे दुसरे संमेलन नागपुरात झाले होते, तिसरे संमेलन वाशीम ला तर चौथे साहित्य संमेलन तेलंगणा राज्याची राजधानी हैद्राबाद येथे पार पडले होते. या साहित्य संमेलनात महाराष्ट्रातून शेषराव चव्हाण,प्रकाश जाधव,होमसिंग पवार,सुमित राठोड, एकनाथ गोफणे, सुग्रीव राठोड भीमराव पवार यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती.

Gor Banjara Sahitya Sammelan
Shabd Marathi Vishwa Sahitya Sammelan: अकरावे शब्द मराठी विश्व साहित्य संमेलन लेह-लडाखमध्ये

आयोजक आशावादी

नागपूरातच संघटनेची मोठी फौज तयार असल्याने सदर संमेलन यशस्वी होईल, असा आशावाद संमेलनाचे मुख्य आयोजक मनोहर चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. येत्या रविवारी २२ नोव्हेंबर ला संमेलनाचे 'मुख्यसंयोजक' व 'स्वागताध्यक्ष' यांची घोषणा करण्यात येणारअसल्याची माहिती मुख्य आयोजक मनोहर चव्हाण यांनी दिली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.