Nanded News | लोहा येथे १० ऑक्टोबररोजी तिसरे जिल्हा मराठी साहित्य संमेलन

स्व. भाई डॉ. केशवराव धोंडगे साहित्य नगरीत साहित्यिक, कवी, कथाकारांची मांदियाळी; स्वागताध्यक्ष डॉ. अजय क्षीरसागर यांची माहिती
District Marathi Sahitya Sammelan Nanded
संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. अजय क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. Pudhari
Published on: 
Updated on: 

District Marathi Sahitya Sammelan Loha Nanded

लोहा : मराठवाडा साहित्य परिषद, शाखा नांदेड आणि डी. के. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, लोहा यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरे जिल्हा मराठी साहित्य संमेलन शनिवारी (दि. १० ऑक्टोबर) लोहा येथे आयोजित करण्यात आले आहे. स्व. माजी खासदार भाई डॉ. केशवराव धोंडगे साहित्य नगरी, डी. के. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, सायाळ रोड येथे हे संमेलन होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. वि. ना. कदम संमेलनाच्या अध्यक्षस्थानी राहणार असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. अजय क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी मसाप शाखा नांदेडचे अध्यक्ष बालाजी इबितदार, कार्यवाह प्रा. महेश मोरे, सहकार्यवाह राम तरटे आणि संस्थेचे अध्यक्ष दिगंबर क्षीरसागर उपस्थित होते.

District Marathi Sahitya Sammelan Nanded
Nanded News : सोयाबीनच्या पीक कापणी प्रयोगाला जिल्हाधिकाऱ्यांची शेताच्या बांधावर जाऊन भेट!

संमेलनास विशेष निमंत्रित म्हणून आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि आमदार आनंदराव पाटील बोंढारकर उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य तथा ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, सायाळ रोड चौक येथे नगराध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ग्रंथपूजन होईल. सकाळी ९ वाजता संमेलनस्थळी पत्रकार हरिहर धुतमल आणि पत्रकार बा. पू. गायखर यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी संतोष तळेगावे यांच्या साहित्यामधील ‘माणिक-मोती’ या चित्रप्रदर्शनाचेही उद्घाटन होईल.

सकाळी १० वाजता ‘कैवल्य विचारपीठ’ येथे मुख्य उद्घाटन सोहळा होईल. या कार्यक्रमास माजी संमेलनाध्यक्ष शंकर वाडेवाले, ज्येष्ठ कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर, मसाप केंद्रीय कार्यकारिणी सदस्य संजीव कुलकर्णी, सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय माने, मसाप संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. जगदीश कदम, ज्येष्ठ संपादक शंतनू डोईफोडे, ललित कला प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष गजानन मुधोळ पाटील आणि शिक्षणाधिकारी माधव सलगर उपस्थित राहणार आहेत.

District Marathi Sahitya Sammelan Nanded
Nanded News : किनवट तालुक्यातील १८० गावांत स्मशानभूमीपर्यंत रस्ताही नाही !

दुपारी १ वाजता प्रसिद्ध उद्योजक मारोतराव कळवे गुरुजी यांची प्रकट मुलाखत होणार असून, डॉ. पृथ्वीराज तौर आणि दिगंबर कदम हे मुलाखतकार म्हणून सहभागी होतील. दुपारी ३ वाजता प्रसिद्ध साहित्यिक व कथाकार डॉ. गणेशराज सोनाळे यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथनाचा कार्यक्रम होणार आहे. यात डॉ. शंकर विभूते, वीरभद्र मिरेवाड आणि प्रा. स्वाती कान्हेगावकर सहभागी होणार आहेत.

सायंकाळी ४ वाजता कविसंमेलन होणार असून, त्याच्या अध्यक्षस्थानी जगन शेळके राहतील. यामध्ये विविध कवी सहभागी होणार आहेत. त्यानंतर होणाऱ्या समारोप कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. अशोक गवते पाटील उपस्थित राहणार आहेत.

District Marathi Sahitya Sammelan Nanded
Nanded News : अवैध धंद्यांना दणका; महिनाभरात १,६०७ गुन्हे

संमेलनाच्या आयोजनासाठी स्वामी विवेकानंद ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अवधूत पाटील क्षीरसागर, मसाप शाखा नांदेडचे अध्यक्ष बालाजी इबितदार, उपाध्यक्ष दिगंबर कदम व श्रीनिवास मरस्के, कार्यवाह प्रा. महेश मोरे, सहकार्यवाह राम तरटे, कोषाध्यक्ष व्यंकटेश चौधरी यांच्यासह कार्यकारिणी सदस्य डॉ. संजय जगताप, शेख निजाम गवंडगावकर, प्रा. धाराशिव शिराळे, प्रा. डॉ. ललिता बाकोरे-शिंदे, व्यंकटेश काटकर, अनुजा डोईफोडे, अॅड. विजयकुमार भोपी आणि अॅड. गजानन पिंपरखेडे परिश्रम घेत आहेत.

साहित्य संमेलनास साहित्यप्रेमी, कवी, लेखक, कथाकार आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news