वर्धा : घरगुती वादातून पतीची गळा आवळून हत्या; पत्नीला अटक

file photo
file photo

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : घरगुती वादातून पत्नीने पतीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागठाणा परिसरात मंगळवारी (दि.७) मध्यरात्री ही घटना घडली. पोलिस चौकशीदरम्यान या घटनेचे बिंग फुटले असून पत्नीला अटक करण्यात आली आहे. गणेश हरिभाऊ भलावी (वय ३७, रा. नागठाणा ) असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे.

नागठाणा येथील गणेश भलावी हे मोलमजुरी करतात. रात्री कामावरून घरी आल्यानंतर त्यांचा पत्नी सुनिताशी घरगुती कारणातून वाद झाला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. संतापलेल्या पत्नीने रागाच्या भरात गणेशची गळा आवळून हत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सावंगी ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप कापडे यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ, श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पत्नीला अटक केली. दरम्यान गणेशची हत्या केल्यानंतर पत्नी सुनीताने गळफास घेतल्याचा बनाव केला. घटनास्थळी पाहणी केली असता काही बाबी संशयास्पद वाटल्या. चौकशीदरम्यान पत्नीनेच हत्या केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news