

घाटंजी (जि. यवतमाळ), पुढारी वृत्तसेवा : घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील जलील शकुर काठोटे व ईसाक शकुर काठोटे या दोन भावांची यवतमाळचे न्यायाधीश १ तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. जी. भंसाळी यांनी पुराव्या अभावी गुरुवारी निर्दोष मुक्तता केली आहे. शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील अँड. उदय पांडे यांनी काम पाहिले. तर आरोपीतर्फे अँड. राजेश साबळे यांनी न्यायालयात बाजू मांडली.
घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील फिर्यादी अविनाश सुभाष आत्राम आणि जलील शकुर काठोटे व ईसाक शकुर काठोटे यांचा चिकन विक्रीचा व्यवसाय होता. त्यात चिकन विक्री करताना ग्राहक बोलावण्यावरुन दोघांत वाद होवून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबतची तक्रार फिर्यादी अविनाश सुभाष आत्राम याने पारवा पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
यावरुन आरोपी जलील शकुर काठोटे, ईसाक शकुर काठोटे विरुद्ध भादंवि कलम २९४, ५०६ व सह कलम ३ (१),(s) अनुसूचित जाती -जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत पारवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर प्रकरणात यवतमाळच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सदर प्रकरणात सुनावणी होवून पुराव्या अभावी दोन्हीही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपी ईसाक काठोटे यांचेतर्फे अँड. राजेश साबळे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.
हेही वाचलंत का?