पुणे : चोरीची तक्रार तब्बल ४४७ दिवसानंतर उघडकीस आली | पुढारी

पुणे : चोरीची तक्रार तब्बल ४४७ दिवसानंतर उघडकीस आली

कुरकुंभ / पुणे : पुढारी वृत्तसेवा : कुरकुंभ (ता. दौंड) एमआयडीसीतील इटर्निस फाईन केमिकल्स कंपनीतून ५ कोटी ४७ लाख २० हजार ३८५ रूपयांचे रोडिअम ऑन ॲल्युमिना केमिकलची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे.

हा चोरीचा प्रकार २४ डिसेंबर २०२० ते ६ जानेवारी २०२२ यादरम्यान घडला आहे. या घटनेला आत्तापर्यंत एकूण ४४७ दिवस पूर्ण झाले आहेत. यासंदर्भात बुधवारी अज्ञात चोरट्याविरूध्द दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत विष्णु बाजीराव डुबे (वय ५६, रा. रक्षकनगर गोल्ड बिल्डींग नंबर बी ३, फ्लॅट नंबर ३०३ खराडी,) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,  इटर्निस फाईन केमिकल्स लिमिटेड कंपनीचे कॅटॅलिस्ट रूममध्ये जॉनसन म्याथे हे अमेरिकन कंपनीकडुन आलेले २० किलो रेडिअम ऑन ॲल्युमिना केमिकल ठेवले होते. २४ डिसेंबर २०२० ते ६ मार्च २०२२ दरम्यानच्या काळात कॅटॅलिस्ट रूममधील हे केमिकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. याबाबतचा तपास पोलीस हवालदार वाघमारे करीत आहेत.

 

Back to top button