भंडारा : ट्रॅक्टर अपघातातील आणखी एकाचा मृत्यू; मृतांची संख्या दोनवर

भंडारा : ट्रॅक्टर अपघातातील आणखी एकाचा मृत्यू; मृतांची संख्या दोनवर
Published on
Updated on

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : लाखांदूर येथील चुलबंद नदी पुलावरून तीस फूट खोल नदीत ट्रॅक्टर कोसळून झालेल्या अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान नागपूर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. राधेश्याम मधुकर ढोरे ( वय २३) असे मृत युवकाचे नाव आहे.

गुरूवारी (दि. 23) कडधान्य घेऊन लाखांदूरकडे येत असलेला ट्रॅक्टर चुलबंद नदी पुलावर असंतुलित होऊन चक्क तीस फूट खोल नदीत कोसळला होता. या घटनेत अण्णा रामचंद्र पारधी ( वय ५०) यांचा मृत्यू झाला होता. तर राधेश्याम मधुकर ढोरे व राष्ट्रपाल सावजी ठाकरे यांच्यावर लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर दोघानां ब्रम्हपुरी व नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

उपचारादरम्यान राधेश्याम मधुकर ढोरे या युवकाचा मृत्यू झाला असून आता या अपघातातील मृत्यू संख्या दोनवर पोहोचली आहे. तर जखमी राष्ट्रपाल ठाकरे यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news