चिंचवड विधानसभा निवडणुक : मतदानाचा टक्का वाढविण्याचे आव्हान

चिंचवड विधानसभा निवडणुक : मतदानाचा टक्का वाढविण्याचे आव्हान
Published on
Updated on

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 53.59 टक्के इतकी होती. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेसाठी येत्या 26 तारखेला पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणूक सुटीच्या दिवशी असल्याने मतदानाचा टक्का घटू न देता तो टिकविण्याचे आणि वाढविण्याचे आव्हान निवडणुकीला सामोरे जाणार्‍या प्रत्येक राजकीय पक्षासमोर असणार आहे.

2019 मध्ये झालेल्या चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीत एकूण 53.59 टक्के इतके मतदान झाले होते. त्यामध्ये 55.94 टक्के इतक्या पुरुष मतदारांचा तर, 50.91 टक्के इतक्या महिला मतदारांचा समावेश होता. तर, 6.25 टक्के इतके तृतीयपंथीय मतदार होते. चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी मतदार यादीनुसार एकूण मतदारांची संख्या 5 लाख 68 हजार 954 इतकी आहे.

त्यापैकी 3 लाख 2 हजार 946 पुरुष मतदार आहेत. तर, 2 लाख 65 हजार 974 महिला मतदार आहेत. तृतीयपंथीय 34 मतदार आहेत. एकूण मतदारांमध्ये 12 हजार 313 दिव्यांग मतदार तर, 80 वर्षावरील 9926 मतदार समाविष्ट आहेत. तसेच, 114 अनिवासी भारतीय, 38 सैनिक मतदार या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न
विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत मतदानाचा 60 टक्क्यांपेक्षाही कमी असलेला टक्का पाहता तो वाढविण्याची गरज आहे. येत्या रविवारी होणार्‍या मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी आहे. या सुटीचे औचित्य साधून फिरायला जाणार्‍या नागरिकांना प्रथम मतदान करण्यासाठी आवाहन करणे, त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे. ही निवडणूक लढविणारे राजकीय पक्षांचे उमेदवार व अपक्ष उमेदवार यांना रविवारी मतदानाचा टक्का कसा वाढेल, यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण, त्यावरच उमेदवारांचे यशापयश अवलंबून राहणार आहे.

मतदारांसाठी महत्त्वाच्या टिप्स
मतदानासाठी आपले नाव मतदारयादीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे मतदार यादीत आपले नाव शोधा. त्यासाठी वोटर हेल्पलाईन अ‍ॅपचा वापर करा. मतदानासाठी आवश्यक असलेली मतदार माहिती चिठ्ठी ही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडून किंवा वोटर हेल्पलाईन अ‍ॅपमधून मिळविता येते. निवडणुकीसंबंधी कोणतीही शंका असल्यास 1950 या क्रमांकावर संपर्क साधावा. मतदान केंद्रामध्ये मोबाईल, हेडफोन, कॅमेरा किंवा अन्य कोणतेही गॅझेट नेण्यास मनाई आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news