तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव गुरुवारी नागपूरात; अनेकांचा पक्षप्रवेश

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव गुरुवारी नागपूरात; अनेकांचा पक्षप्रवेश

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : भारत राष्ट्र समितीने तेलंगणा पाठोपाठ महाराष्ट्रात विस्ताराची योजना ठरविली आहे. विदर्भात सर्वदूर पक्ष विस्तार करण्यासाठी नागपूर येथे भारत राष्ट्र समिती पक्ष, विदर्भ (BRS) च्या राज्यातील पहिल्या कार्यालयाचे उद्घाटन तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री, तथा भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते येत्या गुरुवारी (दि. १५) रोजी होणार आहे.

यानिमित्त कार्यकर्ता मेळावा, अनेकांचे पक्षप्रवेश आदी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने नागपूर शहरात ठिकठिकाणी "अब की बार किसान सरकार"चे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. यासंदर्भात आज (दि.१३) चेन्नुर विधानसभेचे आमदार बलका सुमन यांनी पूर्व तयारीचा आढावा घेतला.

दि. १५ जून रोजी दुपारी १ वाजता मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे नागपूर विमानतळावर आगमन होणार आहे. दुपारी १.१५वा जता भारत राष्ट्र समिती पक्ष, (BRS) महाराष्ट्र कार्यालयाचे उद्घाटन रामकृष्ण नगर, साई मंदिराजवळ, वर्धा रोड येथे होणार आहे. दुपारी २ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशिमबाग येथे कार्यकर्ता मेळावा होणार असून मुख्यमंत्री राव सभेला संबोधित करतील अशी माहिती भारत राष्ट्र समितीचे पूर्व विदर्भ समन्वयक ज्ञानेश वाकुडकर यांनी दिली आहे.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news