

वाशिम: पुढारी वृत्तसेवा : आट्यापाट्या या खेळात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल अजित मनोहर बुरे यांना आज (दि.१४) शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला. राज्य शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मला जाहीर झाल्याने मनाला एक समाधान लाभले, अशी प्रतिक्रिया बुरे (Ajit Bure) यांनी दिली.
२०१२ पासून ज्युनियर राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धा खेळण्यास प्रारंभ केला. आत्तापर्यंत चार सबज्युनियर, चार ज्युनियर, पाच वरिष्ठ गट यामध्ये सहभाग नोंदविला. पहिल्याच राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर, सबज्युनियर व राष्ट्रीय स्पर्धा मिळून दोन गोल्ड मेडल, ज्युनियर संघामध्ये तीन गोल्ड मेडल तर सिनियर राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत संघाने चार सुवर्ण पदकांची कमाई केली, असे बुरे (Ajit Bure) यांनी सांगितले.
मला मिळालेल्या पुरस्काराचे श्रेय आट्यापाट्या असोसिएशनचे सचिव प्रा. डॉ. विवेक गुल्हाने व जय गजानन महाराज क्रीडा मंडळाचे अध्यक्ष संजय मिसाळ, वाशीम जिल्हा आट्यापाट्या क्रीडा मार्गदर्शक सागर गुल्हाने, उमेश शिंदे व पवन जयस्वाल यांना देतो.
– अजित बुरे, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार
हेही वाचा