वाशिम : समृद्धी महामार्गावर ट्रकचा अपघात; दोघांचा मृत्यू | पुढारी

वाशिम : समृद्धी महामार्गावर ट्रकचा अपघात; दोघांचा मृत्यू

वाशिम; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर येथून बंगालकडे जाणाऱ्या ट्रकचा चालकाला डूलकी लागल्यामुळे भीषण अपघात झाला. ट्रक समृद्धी मार्गामध्ये मधोमध असलेल्या पुलाचे कटडे तोडून आत पडला. महामार्गाच्या कटड्यासोबत टँकरचे घर्षण झाल्यामुळे डिझेल टँक फुटून ट्रकने भीषण पेट घेतला.

याची माहिती मिळताच महाराष्ट्र सुरक्षा बलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि नगरपरिषद अग्निशामक दल व कारंजा शहर पोलीस स्टेशनला अपघाताची माहिती दिली. शहर पोलीस स्टेशन व अग्निशामक दल यांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. आग इतकी भयंकर होती की ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. यामध्ये असलेले चालक आणि वाहक यांचाही जागीच जळून मृत्यू झाला.

त्यांच्या मृतदेह बाहेर काढण्यासाठी तीन ते चार तास लागले. आगीचा धुर हा समृद्धी हायवे वर दिसत होता. त्यावेळी मदतीसाठी कारंजा शहर पोलीस स्टेशनचे एपीआय पवार, पीएसआय रेगिवाले, पोलीस कॉन्स्टेबल जावेद मिनीवाले, पोलीस कॉन्स्टेबल पवन जाधव, प्रतीक राऊत, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे संजय बुटे, भूषण अवताडे, बाळकृष्ण सावंत, यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.

कारंजा नगर परिषद मुख्याधिकारी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक अधिकारी बाथम व चंदू कटारे, कृष्णा कोकाटे, संकेत अघमे व विधाता चव्हाण, डॉ गणेश पायलट, आतिश चव्हाण, डॉ.सोहेल खान, गुरु मंदिर रुग्णवाहिका सेवा आस-अपातकालीनचे रमेश देशमुख यावेळी यांनी मदत केली.

हेही वाचा;

Back to top button