वाशिम : विळेगावातील शेतकरी नाल्याच्या पुरात वाहून गेला | पुढारी

वाशिम : विळेगावातील शेतकरी नाल्याच्या पुरात वाहून गेला

वाशिम : पुढारी वृत्तसेवा – कारंजा तालुक्याच्या शेतकरी नाल्याच्या पुरामध्ये वाहून गेल्याची घटना घडली आहे. ज्ञानेश्वर राठोड ( वय ४०) असं वाहून गेलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. आज शेतात जात असतांना त्यांना नाल्याच्या खचलेल्या पुलाचा अंदाज न आल्याने पुराच्या पाण्यात पडून वाहून गेले. या घटनेनंतर ग्रामस्थ त्यांचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप त्यांचा शोध लागला नाही.

सदर घटना सविस्तर अशी की, कारंजा तालुक्यातील विळेगाव येथील एक ४० वर्षीय शेतकरी ज्ञानेश्वर सुभाष राठोड रा. विळेगांव ते जामठी या रस्त्यावरील नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना घडली आहे. विळेगाव ते जामटी या गावालगत हा पूल मागील काही महिन्यांपासून खचला होता.

विळेगाव ते जामठी रोडवरील गायरन जवळी रोड पुलामध्ये ही घटना घडली. विळेगाव शेतकरी ज्ञानेश्वर सुभाष राठोड हे आज दि. १२ जुलै रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान नाल्यामध्ये व नंतर उन्द्री प्रकल्पामध्ये वाहून गेल्याची माहिती देण्यात आली. श्याम सवाई अध्यक्ष सर्वधर्म मित्र मंडळ सास शोध व बचाव पथक यांना उपसरपंच राहूल रवि राव यांनी ही माहिती कळवली. सदर धरण पात्रामध्ये शोधमोहीम करण्याकरीता संत गाडगे बाबा शोध व बचाव पथक दिपक सदाफळे यांच्या टिमला पाचरण करण्यात आले आहे. सध्या सास टिम वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा शोध घेत आहेत.

Back to top button