नागपुरात मेघगर्जनेसह पाऊस: अद्याप मान्सूनची प्रतीक्षाच

 Nagpur Rain
Nagpur Rain
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा :  मृग नक्षत्र सुरू होऊन 10 दिवस झाल्यानंतरही पावसाने नागपूर, पूर्व विदर्भात दडी मारल्याने बळीराजाची चिंता बळावली होती. 10 ते 13 जून दरम्यान पाऊस येण्याचा हवामान खात्याने वर्तविलेला पहिला अंदाज खोटा ठरला. नागपुरातील अनेक ठिकाणी जप,तप अनुष्ठान तसेच जगनाथ बुधवारी येथील जागृतेश्वराला जलाभिषेक देखील करण्यात आला. मात्र, काहीसा रिमझिम आलेला पाऊस पुढे उकाडा वाढविणारा ठरला.आज (दि.17) दुपारी सव्वाचार नंतर झालेल्या जोरदार विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने नागपूरकरांना चांगलेच सुखावले.

मात्र अजूनही हा मान्सूनचा पाऊस नसल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रविणकुमार यांनी 'पुढारी' शी बोलताना दिली. आज प्रचंड उकाडा होत असल्याने हा अचानक झालेला बदल आहे. असाच पाऊस काही काळ सुरू राहिल्यास नक्की सांगता येईल, असे स्पष्ट केले. मेघगर्जनेसह झालेल्या या पावसाने घरोघरी एसी, पंखे आणि कुलरची सुरू असलेली घरघर काही क्षणांसाठी थांबली. या जोरदार पावसाने दक्षिण नागपुरासह अनेक भागातील वस्त्यांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला.

अग्निशमन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरले, सिमेंट रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे अनेक भागात पाणी घरात शिरल्याच्या तक्रारी ऐकायला मिळाल्या. सुमारे दीड -दोन तास हा पाऊस सुरू असल्याने उकाडा मोठ्या प्रमाणात कमी झाला.बळीराजाला पेरणी करण्याच्या दृष्टीने दिलासा मिळाला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news