नागपूर : भरधाव कार पार्किंगमध्ये शिरली, ५ गंभीर जखमी | पुढारी

नागपूर : भरधाव कार पार्किंगमध्ये शिरली, ५ गंभीर जखमी

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : वाठोडा परिसरातील केडीके इंजीनियरिंग कॉलेजजवळ आज (दि.15) दुपारी एक भीषण अपघात घडला. यात एक भरधाव कार अनियंत्रित झाल्याने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर धडकली. यात या परिसरात उभे असलेले अनेक जण जखमी झाले. यासोबतच वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ही घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली.

घटनास्थळी मोठी गर्दी गोळा झाली. ही भरधाव कार एक अल्पवयीन तरुण चालवित होता. कार मालक एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याची असल्याची प्राथमिक माहिती आहे. नंदनवन, सक्करदरा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना मेडिकल रुग्णालयाच्या दिशेने रवाना करण्यात आले. जखमी झालेल्या गंभीर पाच जखमीपैकी दोन जखमींना अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Back to top button