Caste Census| जातनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे गप्प का? : चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule : पंतप्रधानांचं अभिनंदन करण्याऐवजी श्रेय लाटण्याचे काम
Caste Census
चंद्रशेखर बावनकुळे
Published on
Updated on

Caste Census

नागपूर : जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार आता गप्प का बसले ? इतके दिवस याबाबतीत घसा कोरडा करणारे नेते आता केंद्रातील मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल अभिनंदन करण्याचं औदार्य दाखवणार की घाणेरडं राजकारणच करणार? असा सवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरूवारी (दि.१) केला.

Caste Census
OBC Caste Census |ओबीसी महासंघाच्या संघर्षाला यश! केंद्र सरकारची जातिनिहाय जनगणनेची घोषणा

केवळ आपल्या स्वार्थी राजकारणासाठी या नेत्यांनी आणि त्यांच्या पक्षांनी जातीचे संकुचित राजकारण केले. पण या जातीतील नागरिकांना प्रगतीच्या, विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एवढ्या वर्षात या राजकीय पक्षांनी काहीच केले नाही. आता मोदी सरकारने या जातीनिहाय जनगणनेच्या माध्यमातून या देशातील सर्वच जाती प्रवाहांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संकल्प केला असताना त्यांचे अभिनंदन करण्याऐवजी श्रेय लाटण्याचे काम ते करीत आहेत. यातून या विरोधी पक्षांची संकुचित मानसिकता देशाला पुन्हा एकदा दिसून आली, असाही टोला बावनकुळे यांनी यावेळी लगावला.

Caste Census
Caste Census | मोदी सरकार करणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news