

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : एकीकडे मराठा आरक्षण मुद्यावर सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपली म्हणून 25 ऑक्टोबरपासून मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसणार आहेत. दुसरीकडे ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये, यासाठी चंद्रपूरला आमरण उपोषण करणाऱ्या ओबीसी महासंघाचे रवींद्र टोंगे यांनी देखील सरकारला इशारा दिला आहे. Ravindra Tonge
सरकारने जर ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. तर ओबीसी रस्त्यावर उतरतील, आम्ही देखील पुन्हा उपोषणाची तयारी करणार असे त्यांनी धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाच्या एका कार्यक्रमात जाहीर केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. Ravindra Tonge
महाराष्ट्र सरकारने आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासित केले आहे की ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही.ही आमची मागणी त्यांनी मान्य केली आहे.
आम्ही एक नोव्हेंबरपासून ओबीसीच्या भविष्यासाठी भेटीगाठी अभियान राबविणार असून प्रत्येक ओबीसी पर्यंत पोहोचणार आहोत.
आमच्या आरक्षणांमधून जर कोणाला काही दिले जाणार असेल तर आमची सुद्धा रस्त्यावर उतरण्याची भूमिका आहे. आमच्या संविधानिक मागण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. यावेळी ओबीसी रस्त्यावर येणार ,देशभर आंदोलन करणार ओबीसीं मधून आरक्षण देणं सरकारला महागात पडेल, सरकार दिलेला शब्द पाळणार नसल्यास आम्हाला सुद्धा उपोषणाची तयारी करावी लागणार असे यावेळो ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी सांगितले. यावेळी सचिन राजूरकर,महेंद्र ब्राम्हणवाडे, दिनेश चोखारे, ऋषभ राऊत, शंतनू धोटे, परमेश्वर राऊत आदी उपस्थित होते.
हेही वाचा