नागपूर : मोबाईल न दिल्याने मुलाने केली आईची हत्या | पुढारी

नागपूर : मोबाईल न दिल्याने मुलाने केली आईची हत्या

नागपूर – पुढारी वृत्तसेवा – हुडकेश्वर पोलिस स्टेशन अंतर्गत मुलाने आईची हत्या केल्याप्रकरणी अखेर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे . मोबाईल न देण्याच्या किरकोळ कारणावरून मुलाने आपल्या जन्मदात्या आईची गळा आवळून हत्या केली. हुडकेश्वर पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरु आहे, प्राथमिक शवविच्छेदन अहवालानंतर या हत्येची पुष्टी झाली. या प्रकरणी अल्पवयीन मुलाने हत्या केल्याची कबुली सुद्धा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Back to top button