Nagpur Winter Session : यंदा नागपूरमधील हिवाळी अधिवेशन झटपट गुंडाळणार? | पुढारी

Nagpur Winter Session : यंदा नागपूरमधील हिवाळी अधिवेशन झटपट गुंडाळणार?

नागपूर पुढारी वृत्तसेवा : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं प्राथमिक वेळापत्रक जाहीर झाले असून दि ७ ते २० डिसेंबर दरम्यान हे अधिवेशन नागपुरात  होणार आहे. लोकसभा आणि इतर निवडणुकांच्या धामधुमीत यंदाचे अधिवेशन होणार की नाही इथून तर झटपट अवघ्या १० दिवसांत गुंडाळले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेही सत्तेत असले की दोन आठवड्याचे कामकाज करायचे, विरोधक म्हणून तीन आठवड्यांच्या अधिवेशनाची मागणी करायचो हे समीकरण आता रूढ झाले आहे. (Nagpur Winter Session)

Nagpur Winter Session : अधिवेशनाचे कामकाज २० डिसेंबरपर्यंतच

साधारणपणे परंपरेनुसार आठवड्याच्या शेवटच्या टप्प्यात शुक्रवारी अधिवेशनाचे सूप वाजते. मात्र, यावेळी ते कार्यक्रम पत्रिकेनुसार 20 डिसेंबर अर्थात  बुधवारीच गुंडाळले जाण्याची शक्यता आहे. ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाचे कामकाज २० डिसेंबरपर्यंतच दाखविण्यात आले आहे. काँग्रेसने यावर आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, विदर्भातील हे अधिवेशन दोन महिने चालले पाहिजे, असे म्हणणारे आज सत्तेत आहेत. फडणवीस आज सत्तेत आहेत. ते विदर्भाचे आहेत. त्यांनी अधिवेशन नागपूर करारप्रमाणे चालवले पाहिजे. यामुळे हिवाळी अधिवेशन दोन महिने घेतले पाहिजे. दरम्यान, पुन्हा हिवाळी अधिवेशनापर्यंत काय- काय खेळ होतात ते पाहिले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने जे ताशेरे ओढले आहेत, ते सत्ताधाऱ्यानी समजून घेतले पाहिजे असेही पटोले यांनी नमूद केले.
हेही वाचा 

Back to top button