Nagpur Crime | फ्रेंडशिप डेच्या भेटीचा दुर्दैवी शेवट: लग्नाची मागणी, गिफ्टवरून वाद अन् मैत्रिणीला पुलावरून ढकलले

नागपूरच्या खामला परिसरात तरुणीचा मृतदेह कन्हान नदीवरील जुन्या पुलाखाली आढळून आल्यानंतर खळबळ
Nagpur Murder Case
अश्विनी डे, आशीष उर्फ मोनू मनपियाPudhari
Published on
Updated on

Nagpur Murder Case

नागपूर : फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने झालेल्या भेटीचा शेवट थेट खुनात झाला. नागपूरच्या खामला परिसरातील अश्विनी सुरेश डे (वय २९) हिचा मृतदेह कन्हान नदीवरील जुन्या पुलाखाली आढळून आल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र कन्हान पोलिसांनी अवघ्या २४ तासांत गुन्ह्याचा छडा लावत तिचा मित्र आशीष उर्फ मोनू किशोर मनपिया (वय ३१) याला नागपूरच्या ऑटोमोबाईल चौक परिसरातून अटक केली. न्यायालयाने आरोपीला ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के आणि एसडीपीओ संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैजयंती मांढवधरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

Nagpur Murder Case
Nagpur Crime : आशी डे हत्याकांडात मुख्य आरोपी मोनू उर्फ आशीष मनपिया अटकेत; कन्हान पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे ट्रॅकमनच्या सतर्कतेने उलगडले प्रकरण

रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्री गस्त घालत असलेल्या रेल्वे ट्रॅकमनला कन्हान नदीवरील जुन्या रेल्वे पुलाजवळून महिलेच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. टॉर्चच्या प्रकाशात पाहणी केली असता पुलाखाली एक महिला पडलेली दिसली. त्यांनी तातडीने कन्हान पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला.

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून आरोपीपर्यंत पोहोचले पोलीस

घटनास्थळी मिळालेले वैज्ञानिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. त्यानंतर ऑटोमोबाईल चौक परिसरातून आरोपी आशीष मनपिया याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

Nagpur Murder Case
​Nagpur Crime | नागपुरातील चर्चित युवती आशी डेचा मृतदेह कान्हान नदीत आढळला; हत्या असल्याचा संशय!

लग्नाच्या मागणीवरून वाद, संतापातून पुलावरून ढकलले

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, रविवारी सायंकाळी आशीष अश्विनीच्या घरी गेला होता. त्यानंतर दोघे शहरात फिरत मध्यरात्रीच्या सुमारास कन्हान येथील जुन्या पुलाजवळ पोहोचले. तेथे लग्न करण्याची मागणी आणि फ्रेंडशिप डेच्या गिफ्टवरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला. संतापाच्या भरात आरोपीने अश्विनीला पुलावरून खाली ढकलल्याचा आरोप आहे. गंभीर दुखापतीमुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

हत्येनंतर मंदिरात दर्शन, पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

घटनेनंतर आरोपी खापरखेडा येथील पंचमुखी हनुमान मंदिरात गेला. त्यानंतर दुचाकीवरून विविध भागांत फिरून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तांत्रिक तपास आणि खबऱ्यांच्या अचूक माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली.

प्राथमिक तपासात आरोपी आणि मृत तरुणी दोघेही अमली पदार्थांच्या व्यसनाधीन असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी आशीषविरुद्ध यापूर्वी सुमारे १० गुन्हे, तर अश्विनीविरुद्ध दोन गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. या हत्येचा तपास सुरू असून सर्व बाजूंनी चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news