Nagpur Crime : आशी डे हत्याकांडात मुख्य आरोपी मोनू उर्फ आशीष मनपिया अटकेत; कन्हान पोलिसांची मोठी कारवाई

तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपी जेरबंद; हत्येचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात
Death
DeathPudhari
Published on
Updated on

नागपूर : नागपूरातील बहुचर्चित आशी डे हत्याकांडात कन्हान पोलिसांना मोठे यश मिळाले असून, मुख्य आरोपी मोनू उर्फ आशीष मनपिया याला अटक करण्यात आली आहे. मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स, सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोचत त्याला ताब्यात घेतले. आज आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.

नागपूर शहरात चर्चेचा विषय ठरलेल्या आशी डे हत्याकांडाच्या तपासात कन्हान पोलिसांनी महत्त्वाची प्रगती केली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित मोनू उर्फ आशीष मनपिया याला अटक करण्यात आली असून, या कारवाईला कन्हान पोलिसांचे मोठे यश मानले जात आहे.

Death
​Nagpur Crime | नागपुरातील चर्चित युवती आशी डेचा मृतदेह कान्हान नदीत आढळला; हत्या असल्याचा संशय!

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आशी डे आणि मोनू उर्फ आशीष मनपिया यांच्यात दीर्घकाळ प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. दोघेही एकमेकांवर मानसिक छळ आणि त्रास दिल्याचे आरोप करत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस तपासत आहेत.

तपासादरम्यान पोलिसांनी मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण केले. त्यातून संशयाची सुई मोनू उर्फ आशीष मनपिया याच्याकडे वळल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

Death
Nagpur MD drug racket : नागपुरात ४३.७४ लाखांचा एमडी ड्रग्ज साठा जप्त; दोघांना अटक, एक फरार

सोमवारी पहाटे कन्हान नदीवरील पुलाखाली पाण्यात एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून ओळख पटविली असता तो आशी डे हिचाच असल्याचे निष्पन्न झाले. मृत्यू संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत तपास सुरू केला होता.

प्राथमिक तपासात आशी डेची हत्या अन्य ठिकाणी करून मृतदेह कन्हान नदीत फेकण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार तिच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी करण्यात आली आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीपर्यंत पोलिस पोहोचले.

दरम्यान, हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रेमसंबंधातील वाद, वैयक्तिक वैर, आर्थिक कारणे किंवा अन्य कोणता हेतू होता का, याचा तपास सुरू आहे. तसेच हत्या नेमकी कुठे झाली, मृतदेह नदीपर्यंत कसा आणण्यात आला आणि या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.

पोस्टमार्टम अहवाल, न्यायवैद्यक तपासणी, मोबाईल डेटा आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे कन्हान पोलीस या हत्याकांडातील सर्व दुवे जोडण्याचे काम करत असून, तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणाचा सविस्तर उलगडा होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news