Kunbi caste certificate Rekha Ambure : रेखा अंबुरे यांचे कुणबी जात प्रमाणपत्र रद्द नाही; महसूल विभागाने केले उघड

प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या बातम्यांबाबत प्रशासनाकडे अधिकृत आदेश किंवा नोंद उपलब्ध नसल्याचे पत्रातून स्पष्ट
Maratha Kunbi caste certificate
Maratha Kunbi caste certificate file photo
Published on
Updated on

नागपूर : रेखा अंबुरे यांच्या कुणबी जात प्रमाणपत्राबाबत बीड जिल्हा प्रशासनाचा महत्त्वपूर्ण खुलासा आला आहे. दरम्यान, संबंधित कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत कोणतीही अधिकृत कार्यवाही झालेली नाही, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रेखा अंबुरे यांची 2025 च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मागास प्रवर्ग–महिला म्हणून निवड झाल्याचा उल्लेख असून त्यांच्या कुणबी नोंदीबाबत आक्षेप नोंदविण्यात आल्याचे पत्रात नमूद असल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे.

Maratha Kunbi caste certificate
Kunbi caste certificate : सहा महिन्यांत 51 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप

प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या बातम्यांबाबत प्रशासनाकडे अधिकृत आदेश किंवा नोंद उपलब्ध नसल्याचे पत्रातून स्पष्ट होते. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनाचा पत्रात संदर्भ देण्यात आला आहे.

Maratha Kunbi caste certificate
Kunbi caste certificate Rajgad: राजगड तालुक्यात 2 हजार 980 जणांना मिळाले कुणबी दाखले

मात्र, त्यांच्या निवेदनातील माहिती आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत नोंदीमध्ये तफावत असल्याचे प्रशासनाने निदर्शनास आणले आहे. यामुळेच रेखा अंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याचे अधिकृतरीत्या सिद्ध करणारा कोणताही आदेश या पत्रानुसार नाल्याचे महसूल विभागाने म्हटले आहे.

Maratha Kunbi caste certificate
Kunbi caste certificate : कुणबी बोगस प्रमाणपत्रांची होणार सखोल पडताळणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news