Kunbi caste certificate : सहा महिन्यांत 51 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप

मराठवाडा : हैदराबाद गॅझेटनुसार वितरित प्रमाणपत्राबाबत स्पष्ष्टता नाही, बहुतांश प्रमाणपत्र जुन्या नियमानुसारच
Kunbi caste certificate distribution
सहा महिन्यांत 51 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटपfile photo
Published on
Updated on

सुनील कच्छवे

छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने सप्टेंबर 2025 मध्ये अध्यादेश जारी करून हैदराबाद गॅझेटियरमधील ऐतिहासिक नोंदींनुसार मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्यास मान्यता दिली. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे गेल्या सहा महिन्यांत मराठवाड्यात तब्बल 51 हजार 696 जणांना कुणबी जात प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहे. तर गेल्या तीन वर्षांत वितरित कुणबी प्रमाणपत्रांची एकत्रित संख्या ही 2 लाख 91 हजार 261 इतकी आहे. दरम्यान, यात हैदराबाद गॅझेटनुसार किती प्रमाणपत्र वितरित झाली याबाबत स्पष्टता नाही.

बहुतांश प्रमाणपत्र ही जुन्या नियमानुसारच दिल्याचे समजते. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यासाठी मराठवाड्यात मागील काही वर्षांपासून सातत्याने आंदोलने सुरू आहेत. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली हा लढा मध्यंतरी तीव करण्यात आला. त्याची दखल घेत राज्य सरकारने कुणबी जात प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी 7 सप्टेंबर 2023 साली निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली.

Kunbi caste certificate distribution
Ready Reckoner Rates Maharashtra 2026: रेडीरेकनर दर जैसे थे! राज्य सरकारचा बांधकाम क्षेत्राला मोठा दिलासा

या समितीने 58 लाखांहून अधिक निजामकालीन व इतर मराठा-कुणबी नोंदी शोधून काढल्या. त्याआधारे कुणबी प्रमाणपत्र वाटप सुलभ करण्यात येत आहे. उपविभागीय अधिकार्‌‍यांकडे अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर ही प्रमाणपत्रे वितरित केली जात आहेत. दरम्यान, गतवर्षी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा आंदोलन होऊन हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने 2 सप्टेंबर 2025 रोजी मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटियर लागू करणारा महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला.

यानुसार मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. या जीआरच्या आधारे कुणबी नोंदींची पडताळणी करून पात्र मराठा व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. मराठा समाजाच्या नागरिकांना, ज्यांचे पूर्वज निजामकालीन दस्तऐवजात कुणबी म्हणून नोंदलेले आहेत, त्यांना कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Kunbi caste certificate distribution
Fake liquor | बनावट दारूचा महापूर मोठा, जप्त केला 10 कोटींचा साठा

मराठवाड्यात शिंदे समिती स्थापन झाल्यापासून मार्च 2026 पर्यंत तब्बल 2 लाख 91 हजार 261 कुणबी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत. तर हैदराबाद गॅझेटियरचा जीआर लागू झाल्यापासून म्हणजे सप्टेंबर 2025 पासून मार्च 2026 पर्यंतच्या सहा महिन्यांत वितरित प्रमाणपत्रांची संख्या ही 51 हजार 696 इतकी आहे.

समिती स्थापन झाल्यापासून वाटप कुणबी प्रमाणपत्रे

छत्रपती संभाजीनगर - 22,118

जालना - 17031

परभणी - 16925

हिंगोली - 11974

नांदेड - 4693

बीड - 1, 98, 329

लातूर - 2510

धाराशीव - 1768

एकूण - 2, 91, 261

सहा महिन्यांतील कुणबी प्रमाणत्र

संभाजीनगर -2464

जालना - 2656

परभणी - 4200

हिंगोली - 3295

नांदेड - 398

बीड - 34662

लातूर -301

धाराशिव -3720

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news