नागपूर: अन् तिची गाडी घेऊन गेला ‘तो’ परत आलाच नाही

नागपूर: अन् तिची गाडी घेऊन गेला ‘तो’ परत आलाच नाही
Published on: 
Updated on: 

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: ओएलएक्सवर बाईक विक्रीची जाहिरात टाकत असाल तर सावधान…. कारण ते एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. ऑनलाइन जाहिरात पाहून वाहन खरेदीसाठी आलेल्या तरुणाने ट्रायल घेतो, म्हणून दुचाकी घेऊन गेला तो, काही परत आलाच नाही. ट्रायलच्या नावावर वाहन चोरीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे.

पारुल सोनी असे तरुणीचे नाव आहे. पारूलने महागडी गाडी विक्रीची जाहिरात OLX वर पोस्ट केली. ती गाडी पाहण्यासाठी पारुलला केडीके कॉलेज रस्त्यावर पहायला बोलावले ट्रायल घेतो असे सांगितले. मात्र, दुचाकी घेऊन पसार झाल्याने फसवणूक आणि चोरीची तक्रार देण्याची वेळ पारूल सोनीवर आली. आता पोलीस त्या चोरट्याचा शोध घेत आहेत अशी माहिती गणेश कल्याणकर, नंदनवन पोलीस स्टेशन यांनी दिली.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news