नागपूर : अनैतिक संबंधातून पत्नीचा खून | पुढारी

नागपूर : अनैतिक संबंधातून पत्नीचा खून

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : कन्हान पोलीस स्टेशनच्या हद्दीत पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली. दुलेश्वरी अमित भोयर (वय 28 वर्षे) असे मृतक महिलेचे तर अमित भोयर (वय 32) असे आरोपी पतीचे नाव आहे.

दोन वर्षांपूर्वी यांचे लग्न झाले होते. नुकतीच त्यांना एक मुलगी झाली होती. सततच्या वादाला कंटाळून अमितने आज दूलेश्वरीचा गळा कापून हत्या केली. दुसऱ्या एका घटनेत इमामवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कापला. वस्तीत मंगळवारी नितीन सोहनलाल रोहनबागे (वय 39 रा. गंगाबाई घाट) याची तीन आरोपींनी हत्या केली. यापैकी एका आरोपीच्या पत्नीसोबत नितीनचे अनैतिक संबंध होते. नितीनला रंगेहात पकडल्यानंतर तो संधीच्या शोधातच होता. यातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून दोघे फरार आहेत. गब्बर उर्फ राजेश सौदान चव्हाण वय 47, इमामवडा, रितेश उर्फ बाबल्या संजय झांझोटे, अनिकेत श्रावण झांझोटे राहणार सदर, नवीन वस्ती धोबीघाट अशी आरोपींची नावे आहेत.

Back to top button