नागपूर: बिल न देता वीज कर्मचा-याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल | पुढारी

नागपूर: बिल न देता वीज कर्मचा-याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : महावितरणच्या व्हीएनआयटी शाखा कार्यालयांतर्गत कार्यरत वरिष्ठ तंत्रज्ञ शेख इसूफ शेख रहमान यांना मारहाण केली. या प्रकरणी लक्ष्मीनगर येथील आकाश कृष्णा  डकाहा याच्याविरोधात बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक लक्ष्मीनगर पाण्याच्या टाकीजवळील कृष्णा अशोक डकाहा या ग्राहकाने मागील तीन महिन्यांपासून विजेचे बील भरलेले नाही, त्यांच्याकडील 10, 450 रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी शेख इसुफ शेख रहमान हे निशा तरेकर आणि हरिष तराळे या सहका-यांसमवेत गेले होते. तेथे आकाशने थांबा पैसे घेऊन येतो म्हणून सांगितले. अर्धा तास होऊनही तो काही प्रतिसाद देत नाही, हे बघून पैसे द्या, अन्यथा वीजपुरवठा खंडित करु असे सांगत शेख इसुफ शेख रहमान वीजपुरवठा खंडित करण्यास खुर्चीवर चढले. मात्र, आकाश याने  शेख रहमान यांना मागून ओढून मारहाण केली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा या कारणास्तव बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा 

Back to top button