Nagpur Firing: नागपुरात खळबळ! काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर गोळीबार; दरवाजात 5 वर्षांची मुलगी उभी, CCTV फुटेज समोर

Nagpur Congress Corporator Firing: नागपूरच्या वाठोडा परिसरात काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर मध्यरात्री अज्ञातांनी गोळीबार केल्याने खळबळ उडाली.
Nagpur Congress Corporator Firing
Nagpur Congress Corporator FiringPudhari
Published on
Updated on

Nagpur Congress Corporator Firing: नागपूरमध्ये काँग्रेसचे नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर मध्यरात्री गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. वाठोडा परिसरात दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवरून येत त्यांच्या घरावर गोळी झाडल्याची घटना घडली. सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, गोळी लागल्याने घराची काच फुटून नुकसान झाले आहे.

गोळीबाराची ही संपूर्ण घटना घराबाहेर लावलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमध्ये दोन जण दुचाकीवरून येताना दिसत असून, त्यापैकी एकाने चालत्या दुचाकीवरून घराच्या दिशेने गोळी झाडल्याचे दिसत आहे. गोळीबार केल्यानंतर दोघेही घटनास्थळावरून तात्काळ फरार झाले.

मध्यरात्री 12.30 च्या सुमारास गोळीबार

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी रात्री सुमारे 12.30 वाजता घडली. गोळीबाराच्या वेळी नगरसेवक शुभम मोटघरे आणि त्यांचे कुटुंब घरातच होते. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच आमदार विकास ठाकरे, तसेच ACP, DCP आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घराबाहेरील तसेच परिसरातील इतर CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

दरवाजाजवळ उभी होती 5 वर्षांची मुलगी

या घटनेबाबत शुभम मोटघरे यांनी धक्कादायक माहिती दिली. गोळीबार झाला, त्यावेळी ते स्वतः बाल्कनीत होते. त्यांची अवघी पाच वर्षांची मुलगी दरवाजाजवळ उभी होती, असे त्यांनी सांगितले.

सुदैवाने गोळी कोणालाही लागली नाही आणि मोठी दुर्घटना टळली. मात्र, काही क्षणांचा फरक पडला असता तर गंभीर घटना घडू शकली असती. त्यामुळे या हल्ल्याने मोटघरे कुटुंबासह परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

Nagpur Congress Corporator Firing
Sudhir Mishra Account Recovery: मुंबई पोलिसांकडून प्रसिद्ध दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांचे हॅक अकाउंट रिकव्हर

दुचाकीवरून आले, गोळी झाडली आणि फरार झाले

CCTV फुटेजमध्ये हल्लेखोर वेगाने दुचाकीवरून येताना दिसत आहेत. त्यांनी घरासमोर येत गोळीबार केला आणि क्षणाचाही विलंब न करता तिथून पळ काढला. हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नाही.

गोळीबार नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला? या हल्ल्यामागे वैयक्तिक वाद, राजकीय कारण की अन्य काही कारण आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलीस या सर्व शक्यतांचा तपास करत आहेत.

Nagpur Congress Corporator Firing
Ganpati Procession Egg Throwing Case: माझगावच्या मोरया मिरवणुकीवर अंडी फेकणार्‍या तरुणाला ३६ तासांत अटक

आरोपींचा शोध सुरू

पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासण्यासाठी घेतले असून, हल्लेखोर दुचाकीने कोणत्या दिशेने आले आणि गोळीबारानंतर कुठे गेले, याचा शोध घेतला जात आहे. आरोपींना लवकरच पकडण्यासाठी तपास पथके कामाला लागली आहेत.

या घटनेनंतर नागपुरात राजकीय व्यक्तींच्या सुरक्षेचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. भरवस्तीत एका नगरसेवकाच्या घरावर थेट गोळीबार झाल्याने नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. आता या गोळीबारामागील खरे कारण काय आणि हल्लेखोर कोण आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news