Chandrapur Firing | राजुरा शहर हादरले : न्यायालयासमोर तरुणावर गोळीबार; दोघेजण दुचाकीवरून पसार

मोटारसायकलवरून आलेल्या दोघांचा विनोद उर्फ पापा जाधव यांच्यावर गोळीबार
Rajura Court Firing
विनोद उर्फ पापा जाधवPudhari
Published on
Updated on

Rajura Court Firing

चंद्रपूर : राजुरा तालुका न्यायालयासमोरील गजबजलेल्या परिसरात सोमवारी (दि.२४) सायंकाळी सुमारे सहा वाजताच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरात खळबळ उडाली. नारळपाणी विक्रीच्या दुकानाजवळ बसलेल्या विनोद उर्फ पापा जाधव यांच्यावर मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी समोरासमोर गोळीबार केला. या हल्ल्यात जाधव गंभीर जखमी झाले असून, प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, पापा जाधव हे नारळपाण्याच्या दुकानाजवळ बसले असताना मोटारसायकलवरून दोन तरुण तेथे आले. त्यापैकी एकाने अचानक जाधव यांच्या दिशेने गोळीबार केला. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पसार झाले. न्यायालयासमोर आणि भरवस्तीतच गोळीबार झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Rajura Court Firing
Blasting vibrations threat chandrapur : ब्लास्टिंगच्या कंपनांनी अभ्यंकर वॉर्डातील घरांना धोका; नागरिकांची खासदारांकडे धाव

गोळीबारानंतर उपस्थित नागरिकांनी जखमी जाधव यांना तातडीने राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्याचा निर्णय घेतला. घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पापा जाधव हे सोमनाथपूर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. दरम्यान, गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पूर्ववैमनस्य, व्यावसायिक वाद किंवा अन्य कोणत्या कारणातून हा हल्ला झाला, याचा तपास पोलीस करीत आहेत.

Rajura Court Firing
Chandrapur News | चंद्रपूरमध्ये सिकलसेल व थालेसेमिया रुग्णांसाठी अत्याधुनिक आरोग्यसेवांचा शुभारंभ

राजुरा शहरात यापूर्वीही गोळीबाराच्या गंभीर घटना घडल्या असून, अशा घटनांमध्ये आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. न्यायालयासमोरील गजबजलेल्या परिसरातच गोळीबार झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दाही गंभीर बनला आहे.

हल्लेखोरांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news