Nagpur Borewell Ban | नागपूर जिल्ह्यात बोअरवेल खोदकामांवर बंदी

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून जिल्ह्यात बोअरवेल खोदकामांवर बंदी
  Borewell
BorewellPudhari
Published on: 
Updated on: 

Nagpur Borewell Drilling Banned

​नागपूर : यंदा अपुरे पर्जन्यमान व जलाशयांतील कमी पाणीसाठ्यामुळे जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून जिल्ह्यात बोअरवेल खोदकामांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी नागपूर जिल्ह्यातील बोअरवेल खोदकामांवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. भूजल स्त्रोतांचे संरक्षण, पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांवरील अतिरिक्त ताण कमी करणे व येणाऱ्या काळातील पाणीटंचाईची तीव्रता रोखण्यासाठी शासकीय यंत्रणांमार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यातील संपूर्ण शहरी व ग्रामीण क्षेत्रात हा आदेश लागू करण्यात आला असून सर्व प्रकारच्या नवीन बोअरवेल/कूपनलिका खोदकामांवर तसेच विद्यमान बोअरवेल अधिक खोल करण्याच्या कामांवर तात्काळ प्रभावाने पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी खासगी व्यक्ती, शेतमालक, गृहनिर्माण संस्था, बांधकाम व्यावसायिक, उद्योग, व्यावसायिक आस्थापना, संस्था तसेच बोअरवेल खोदकाम करणारे कंत्राटदार, रिगमालक व यंत्रचालक यांना लागू राहील.

  Borewell
Nagpur News : फॉरेस्ट ऑफिस चौक ते आरबीआयकडे जाणारा ८० मीटर रस्ता बंद करण्याचा प्रस्ताव

शासकीय यंत्रणांमार्फत पाणीटंचाई निवारण, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि त्याअनुषंगिक कार्यांसाठी सुरू असलेली किंवा हाती घेण्यात येणारी बोअरवेल खोदकामे या बंदीतून वगळण्यात आली आहेत.

शासकीय यंत्रणेच्या अधिकृत कार्यादेशानुसार कंत्राटदारांमार्फत करण्यात येणाऱ्या अशा कामांनाही हा अपवाद लागू राहील. संबंधित अंमलबजावणी यंत्रणेने कामाचा शासकीय कार्यादेश अथवा सक्षम प्राधिकार्‍याची प्रशासकीय मंजुरी आणि पाणीटंचाई विषयक उद्देश दर्शविणारी कागदपत्रे तपासणीसाठी उपलब्ध ठेवावीत. ही कामे भूजल विषयक कायदे तांत्रिक निकष व सुरक्षिततेच्या तरतुदींचे पालन करून करण्यात यावी. उपविभागीय अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील या आदेशाच्या अंमलबजावणीची पर्यवेक्षण करतील. तहसीलदार, पोलीस विभाग, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था आणि भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या समन्वयाने क्षेत्रीय तपासणी करून प्रतिबंधित खोदकाम थांबविण्याची कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या किंवा अंमलबजावणीत अडथळा आणणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५१ व अन्य लागू कायद्यांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ​ तहसीलदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी या आदेशाची प्रसिद्धी व अंमलबजावणीचा प्रारंभिक अहवाल तात्काळ सादर करावा. या आदेशाची प्रत सूचना फलकांवर व अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत प्रशासनाने कळविले आहे.

  Borewell
Nagpur NCP Protest | ज्ञानेश कुमार यांनी तातडीने राजीनामा द्यावा, काटोलमध्ये राष्ट्रवादीचा मोर्चा

हा प्रतिबंध केवळ नवीन खोदकाम व अधिक खोलिकरणांच्या कामांसाठी असून विद्यमान बोअरवेलचा वापर बंद करण्याचे निर्देश या आदेशद्वारे देण्यात येत नसल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

नागपुरात पाणीसंकट गहिरे ! नागपूर - २४ तासांचा वॉटर शटडाऊन जाहीर झाला असून निम्म्यावर शहराला कदाचित दोन दिवस पाणी मिळणार नाही. २४ तासांचा कामाचा अवधी ठरला असला तरी तो जास्त लागण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news