Nagpur NCP Protest | ज्ञानेश कुमार यांनी तातडीने राजीनामा द्यावा, काटोलमध्ये राष्ट्रवादीचा मोर्चा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख व जिल्हा अध्यक्ष सलील देशमुख यांच्या वतीने काटोलमध्ये मोर्चा
Katol NCP March
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख व जिल्हा अध्यक्ष सलील देशमुख यांच्या वतीने काटोलमध्ये मोर्चा Pudhari
Published on: 
Updated on: 

Katol NCP March

नागपूर : स्वायत्त घटनात्मक संस्थांची स्वायत्तता धोक्यात आल्याप्रकरणी आणि निवडणूक प्रक्रियेतील निष्पक्षतेबाबत गंभीर शंका निर्माण झाल्याने भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख व जिल्हा अध्यक्ष सलील देशमुख यांच्या वतीने बुधवारी (दि.७) काटोलमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यानंतर उपविभागीय अधिकारी, काटोल यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या देशात चाललेल्या राजकीय व प्रशासकीय घडामोडींनुसार मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभारावर आणि कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. निवडणूक आयोगासारख्या सर्वोच्च घटनात्मक संस्थेमध्ये सह-आयुक्तांचे मत आणि कायदेशीर आक्षेप बाजूला सारून एकतर्फी निर्णय घेतले जात आहेत. यामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि निष्पक्षतेवर मोठा प्रश्न निर्माण झाला असून जनता व राजकीय पक्षांचा निवडणूक आयोगावरील विश्वास उडाला आहे.

देशात मतदार याद्यांमध्ये घोळ करून आणि ईव्हीएम (EVM) चा वापर करून निवडणुका जिंकण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे लोकशाहीवरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी आणि निवडणूक आयोगाची प्रतिष्ठा पुनस्थापित करण्यासाठी निष्पक्ष चौकशीची आवश्यक असल्याचे मत अनिल देशमुख यांनी मांडले. यामध्ये प्रामुख्याने मुख्य निवडणूक आयुक्त श्री ज्ञानेश कुमार यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, ज्ञानेश कुमार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, संपूर्ण SIR प्रक्रिया त्वरित रद्द करण्यात यावी.

तसेच देशातील सर्व आगामी निवडणुका या बॅलेट पेपरवर (बॅलेट पत्रिकेद्वारे) घेण्यात याव्यात. या मागण्यांवर तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी आक्रमक आणि ठाम भूमिका या मोर्चाद्वारे व निवेदनाद्वारे मांडण्यात आली आहे. या मोर्चात मोठया संख्येने नागरीक सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांना सरसकट हेक्‍टरी एक लाख मदत द्या

राज्य सरकारने शेतकऱ्यांना सकट मदत देऊ असे जाहीर केले आहे. परंतु किती मदत देणार आणि कधी देणार याचा मात्र काहीच उल्लेख अध्यापिक केला नाही. पंचनामे सुरू आहे हेच केवळ उत्तर सरकार देत आहे. जर सरसकट मदत द्यायचीच आहे तर पंचनामे करण्याची काय आवश्यकता. यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक लाख रुपये तीन हेक्टर पर्यंत मदत द्यावी असे निवेदन सुद्धा यावेळी देण्यात आले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news