Mazhi Ladki Bahin Yojana |'माझी लाडकी बहीण योजना': अर्ज प्रक्रिया आणखी सुलभ; जाणून घ्या

तीन स्तरीय सुविधा व ऑनलाईन सुविधा उपलब्ध
Mazhi Ladki Bahin Yojana
राज्यातील महिलांसाठी “मुख्यमंत्री–माझी लाडकी बहीण” योजना सुरु केली आहे. file photo
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: राज्यातील महिलांसाठी “मुख्यमंत्री–माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यात आली आहे. योजनेसाठी पात्र महिलांना आपले अर्ज सहज भरता यावेत, या दृष्टीने तीन स्तरीय सुविधा व ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिली.

Mazhi Ladki Bahin Yojana
Pune District Bank| 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी बँकेची अभिनव योजना

Summary

  • पोर्टल, मोबाईल ॲपव्दारे, सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन सुविधा

  • ग्रामपंचायत, नगर पंचायत, परिषद व महा पालिका कार्यालय

  • आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्विस सेंटर्स मध्ये अर्ज ऑफलाईन पद्धतीने

Mazhi Ladki Bahin Yojana
'माझी लाडकी बहीण' अविवाहीत मुलीलाही मिळणार लाभ; पहा काय आहे तरतुद?

ग्रामपंचायत, नगर पंचायत/परिषद व महानगर पालिका क्षेत्रात विभाग कार्यालय येथे पात्र महिलांना अर्ज देता येतील. याच बरोबर पोर्टल, मोबाईल ॲपव्दारे, सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिल्याचे त्यांनी सांगितले.

Mazhi Ladki Bahin Yojana
Mazi Bahin Ladki Yojana : 'माझी बहीण लाडकी योजने'साठी पैसे मागणाऱ्यांवर कडक कारवाई होणार

ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज करता येणे शक्य नसेल त्यांना ग्रामीण भागात महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्विस सेंटर, ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामसेवक यांच्याकडे तसेच नागरी भागात अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्विस सेंटर्स मध्ये अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Mazhi Ladki Bahin Yojana
‘माझी लाडकी बहिण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 2 महिन्यांनी वाढवली

31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज सादर करावयाचे आहेत. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असल्याने महिलांनी कोणत्याही मध्यस्थामार्फत अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. अथवा कोणत्याही ठिकाणी अर्ज भरताना कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नाही, असे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news