Mazi Bahin Ladki Yojana : 'माझी बहीण लाडकी योजने'साठी पैसे मागणाऱ्यांवर कडक कारवाई होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
maharashtra govt majhi ladki bahin scheme
लाडकी बहीण योजनेसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला. File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना १ जुलैपासून सुरू करण्यात आली आहे. तसेच वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी पैशांची मागणी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.३) पत्रकारांशी बोलताना दिला.

maharashtra govt majhi ladki bahin scheme
अमरावती : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'साठी पैसे मागणारा तलाठी निलंबित

ते पुढे म्हणाले की, लाडकी बहीण योजनेबाबत महिलांना अरेरावी करणाऱ्या बुलढाण्यातील तलाठ्या वर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या योजनेत नावे नोदविण्यासाठी पैसे मागणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल. या योजनेंतर्गंत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेत वर्षांला ३ गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी सरकारने आर्थिक तरतूद केलेली आहे.

maharashtra govt majhi ladki bahin scheme
माझी लाडकी बहीण योजनेला कोणतीही कालमर्यादा नाही

त्याचबरोबर सरकारकडून आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सर्व वारकऱ्यांना विमा कवच देण्यात आले आहे. ३ जुलै ते २१ जुलैपर्यंत आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्यात येणार आहे. त्यामुळे लाखो वारकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

maharashtra govt majhi ladki bahin scheme
‘माझी लाडकी बहिण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 2 महिन्यांनी वाढवली

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना हिंदूंबाबत केलेल्या विधानावर मुख्यमंत्री शिंदे यांनी टीकास्त्र सोडले. विशिष्ठ वर्गाला खूश करण्यासाठी राहुल गांधी यांनी वक्तव्य केले आहे. त्यांना देशातील संयमी हिंदू कधीही माफ करणार नाहीत. विरोधी पक्षांच्या आरोपांकडे आम्ही लक्ष देत नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news