Pune District Bank| 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी बँकेची अभिनव योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ; जिल्हा बँकेत शंभर रुपयांत खाते
Pune District Bank
जिल्हा बँकेत शंभर रुपयांत नवीन खाते उघडाFile Photo

पुढारी वृत्तसेवा राज्य सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना २०२४'चा लाभ घेण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) बँकेत नवीन खाते केवळ शंभर रुपये भरून उघडण्याची अभिनव योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे आणि उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी दिली.

Pune District Bank
Ajit Pawar Statement| माझ्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेचे कामकाज चालते.

त्यांच्या सूचनेनुसार राज्य सरकारच्या घोषित योजनेचा लाभ मिळण्यासाठीची नवीन खाते उघडण्याची सुविधा बँकेत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

तरी, जिल्हा बँकेतील कोणत्याही शाखेत सध्या चालू असलेल्या बचत ठेव खात्यामध्ये देखील सरकारच्या योजनेतील रक्कम जमा करून लाभ घेता येईल.

Pune District Bank
Lalit Patil Case| ललित पाटीलप्रकरणी आणखी दोन पोलिस बडतर्फ

या खातेदारांना प्रधानमंत्री जीवनज्योती आणि जीवन सुरक्षा विमा योजनेचा लाभ मिळेल. जिल्हा बँकेच्या २९४ शाखा कार्यरत असून,

कार्यालयीन वेळेत महिला भगिनींना योजनेचा लाभ मिळण्यासाठी शंभर रुपयांत खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून देणारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्यातील पहिली बँक ठरल्याचेही अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले.

दरम्यान, अधिक माहितीसाठी बँकेच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news