

Fadnavis On Tiger Shroff Attack: अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जी काही घटना घडली ती निंदनीय आहे. पोलिसांनी या संदर्भात तात्काळ कारवाई सुरू केली आहे. रात्रीच जे आरोपी आहेत त्यांची ओळख पटवण्याचे काम करण्यात आले आहे. त्याबाबत पोलिसांना धागेदोरे सापडले असून कुठल्या प्रकारे पोलीस आरोपींना शोधून काढतील. त्याचबरोबर त्यांच्या पाठीमागे कोण आहे त्यांना देखील शोधण काढले जाईल
देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, गेल्या वेळी ज्या लोकांनी प्रयत्न केला त्यावेळी मुंबई पोलिसांनी त्या आरोपींना शोधून काढले होते. त्यांचा जो आका होता त्याला देखील शोधून काढले होते. त्यामुळं मी ठामपणे सांगतो की कुठल्याही प्रकारे अशा घटना सहन केल्या जाणार नाहीत. मुंबई पोलीस नक्कीच आरोपींना शोधून काढतील.
गृहमंत्री असलेल्या फडणवीस यांनी पोलिसांना असे कोणी उघडपणे चॅलेंज देऊ शकत नाही. हे डरपोक लोक आहेत कुठेतरी लपून बसतात. तिथून अशा प्रकराच्या वल्गना करतात. त्यांच्यात हिंमत नाही. ते भाड्याच्या लोकांद्वारे ऑपरेट करतात. ते महाराष्ट्राबाहेरून आणि देशाच्या बाहेरून देखील ऑपरेट कतात. केंद्र सरकारच्या एजन्सीसोबत संपर्क करून त्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचे काम महाराष्ट्र पोलीस करतील अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.
फडणवीसांनी सांगितलं की, पहिली गोष्ट अशा कोणत्या गँगला घाबरण्याची गरज नाही. कारण गँग ज्या लोकांची आहे. ते लोक डरपोक लोकं आहेत. घाबरट लोक असून ते कुठेतरी लपून बसतात. मुंबई पोलीस अत्यंत प्रोफेशनल आहेत. आजपर्यंत मुंबई पोलिसांनी दाखवून दिलं आहे की अशा प्रकारचे गुन्हेगार मुंबई पोलिसांनी जेरबंद केले आहेत.
फडणवीस म्हणाले की, 'टायगर श्रॉफ यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. मी टायगर श्रॉफ यांना आश्वस्त केले आहे की तुम्ही कोणतीही चिंता करू नये ज्यांनी हे केलं आहे त्यांना शोधून काढणार. आम्ही त्यांना पूर्णपणे सुरक्षित ठेवणार आहे.