Tiger Shroff Firing Case: तीन मालक, कागदपत्रांचा घोळ अन् गोळीबार! टायगर श्रॉफ प्रकरणात पल्सर बाईक जप्त; तपासात नवा खुलासा

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबार प्रकरणात वापरण्यात आलेली पल्सर बाईक पोलिसांनी अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकाजवळून जप्त केली आहे.
Tiger Shroff Firing Case
Tiger Shroff Firing CasePudhari
Published on: 
Updated on: 

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत. या घटनेसाठी वापरण्यात आलेली पल्सर बाईक पोलिसांनी अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकाजवळून जप्त केली आहे. ही बाईक काल रात्री डीएन नगर पोलीस ठाण्यात आणण्यात आली. तसेच, बाईकच्या मालकालाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या पल्सर बाईकचे यापूर्वी तीन मालक होते. बाईकचा पहिला मालक जोगेश्वरी परिसरातील रहिवासी आहे. त्याने ही बाईक दुसऱ्या व्यक्तीला विकली. त्यानंतर दुसऱ्या मालकाने ती तिसऱ्या व्यक्तीला विकली. गोळीबार करणाऱ्यांनी याच तिसऱ्या मालकाकडून बाईक खरेदी केली होती.

मात्र, बाईकची खरेदी-विक्री झाल्यानंतरही तिच्या मालकीची कागदपत्रे अधिकृतपणे हस्तांतरित करण्यात आली नव्हती. त्यामुळे बाईकच्या नोंदणीकृत मालकाची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

पितृपक्षापूर्वी बाईक खरेदी

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्यांनी पितृपक्ष सुरू होण्यापूर्वीच तिसऱ्या मालकाकडून ही बाईक घेतली होती. बाईकच्या व्यवहाराचे पैसेही तिसऱ्या मालकाला मिळाले होते. मात्र, मालकी हक्काची कागदपत्रे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती.

नवरात्री संपल्यानंतर बाईकच्या कागदपत्रांच्या हस्तांतरणाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण झाली की नाही, याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही.

Tiger Shroff Firing Case
NEET Paper Leak: टपरीवर विद्यार्थ्यांच्या गप्पा ऐकल्या; पुण्यातील चहावाल्याने प्रश्नपत्रिकेसाठी मागितले ४.५ लाख; आरोपपत्रातून खुलासा

बाईकच्या मालकाची चौकशी सुरू

पोलिसांनी बाईक जप्त केल्यानंतर तिच्या खरेदी-विक्रीचा संपूर्ण व्यवहार तपासण्यास सुरुवात केली आहे. बाईक कोणाकडून कोणाकडे गेली, ती नेमकी कोणी खरेदी केली आणि गोळीबाराच्या घटनेत तिचा वापर कसा झाला, याचा तपास केला जात आहे.

Tiger Shroff Firing Case
Tiger Shroff Juhu Firing: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अभिनेता टायगर श्रॉफची भेट; म्हणाले, 'मुंबईत गुन्हेगारी टोळीची...'

बाईकच्या मालकाकडून मिळणारी माहिती या प्रकरणाच्या तपासासाठी महत्त्वाची ठरू शकते. दरम्यान, गोळीबार प्रकरणातील इतर आरोपींचा शोध आणि घटनेमागील कारणांचा तपासही सुरू आहे. पोलिसांच्या पुढील तपासातून या प्रकरणातील आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news