Dhirendra Shastri: धीरेंद्र शास्त्रींच्या रामकथेत शिवरायांचा जयघोष; 'माफीनाम्या'नंतर रामकथेत मंचावर झळकले फोटो

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या रामकथेत मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो पाहायला मिळाले.
Dhirendra Shastri
Dhirendra Shastrifile photo
Published on
Updated on

Dhirendra Shastri

नागपूर: बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या रामकथेत मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर धिरेंद्र शास्त्री महाराज यांच्या पाच दिवसीय रामकथेला नागपुरात रविवारपासून सुरवात झाली आहे.

रेशीमबाग मैदानावर आयोजित या रामकथेत मंचावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो लावण्यात आले आहेत. तसेच एलईडीवरही शिवरायांचे फोटो झळकले. शास्त्री यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या तीव्र निषेध झाल्यामुळे रामकथेत कार्यक्रमाच्या मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो लावण्यात आले. तसेच 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'छत्रपती संभाजी महाराज की जय' असा जयघोष अनेकदा करण्यात आला.

Dhirendra Shastri
NCERT Maratha Empire Map: ‘एनसीईआरटी’च्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळला

... अखेर धीरेंद्र शास्त्रींचा माफीनामा

छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. हिंदू राष्ट्राच्या उभारणीची संकल्पना आम्हाला त्यांच्याकडूनच मिळाली आहे. ते आपल्या गुरूप्रती किती समर्पित होते, हे सांगण्याचा प्रयत्न मी केला होता; पण काही हिंदू विरोधी शक्तींकडून माझ्या वक्तव्याला चुकीचे दाखवण्यात आले. तरीही माझ्या वक्तव्यामुळे कुणी दुखावले असेल तर आपण माफी मागतो, अशा शब्दांत बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या बेताल वक्तव्यावर माफी मागितली.

धीरेंद्र शास्त्री काय म्हणाले होते?

छत्रपती शिवाजी महाराज सततच्या युद्धाने थकले होते आणि त्यांनी राजपाट समर्थांकडे सोपवण्याची इच्छा व्यक्त केली होती, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या विधानाचा सर्वस्तरातून निषेध होत आहे. यानंतर त्यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधत माफी मागितली. माझे वक्तव्य चुकीचे दाखवले जाते. आपण कुणाचाही अपमान केला नाही, असे धीरेंद्र शास्त्री म्हणाले.

Dhirendra Shastri
भाजप-संघाचा ठरवून केलेला हा कट आहे का? वडेट्टीवार यांचा सवाल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news