NCERT Maratha Empire Map: ‘एनसीईआरटी’च्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळला

विधान परिषदेत विरोधकांचा गदारोळ; दुरुस्तीसाठी केंद्र सरकारला पत्र
NCERT Books
2025 पासून NCERT पुस्तके स्वस्त होतील: मंत्री धर्मेंद्र प्रधानPudhari News Network
Published on
Updated on

मुंबई : ‘एनसीईआरटी‌’ने तयार केलेल्या आठवीच्या हिंदी आणि उर्दू पुस्तकातून ‌‘मराठा साम्राज्याचा नकाशा‌’ वगळल्याचे संतप्त पडसाद सोमवारी विधान परिषदेत उमटले. विरोधकांनी याबाबत ठोस कारवाईची मागणी करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सभागृहात गोंधळ उडाला. अखेर, यासंदर्भात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारला पत्र पाठविले असून, त्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.

NCERT Books
Ashish Shelar : पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी पुढील अधिवेशनापूर्वी महामंडळे

विधान परिषदेत सोमवारी काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी ‌‘एनसीईआरटी‌’च्या पाठ्यपुस्तकातील ‌‘मराठा साम्राज्याचा नकाशा‌’ वगळल्याबाबत चर्चा उपस्थित केली होती. त्यावेळी बोलताना पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरले.

NCERT Books
Minister Ashish Shelar | पत्रकार, वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी पुढील अधिवेशनापूर्वी महामंडळे

हा विषय मराठा साम्राज्याच्या नकाशाच्या संदर्भातील आहे. याबाबत माहितीच्या अधिकारात संबंधित व्यक्तीला 7 जानेवारी 2026 रोजी उत्तर मिळालेले आहे. तसेच, 30 जानेवारी 2026 रोजी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा व्यापक स्वरूपात अभ्यासक्रमात समावेश करावा, अशी ‌‘सीबीएसई‌’ला विनंती करण्यात आल्याचे उत्तरात म्हटले आहे. त्याच अनुषंगाने ‌‘एनसीईआरटी‌’च्या आठवीच्या पुस्तकात छत्रपती शिवरायांवर ‌‘द राईज ऑफ महाराष्ट्र‌’ या धड्याचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, जेव्हा हा धडा तयार करण्यात आला आणि त्याबाबत चर्चा झाली, तेव्हा त्या नकाशातील त्रुटी सरकारच्या लक्षात आल्या नव्हत्या का, असा सवाल पाटील यांनी केला.

NCERT Books
Iran - America War | 'हास्य जत्रा’ फेम विशाखा सुभेदार यांचा मुलगा आज रात्री कुवेत येथून परतणार!

त्यावर, राज्यमंत्री भोयर यांनी त्रुटींची कबुली देऊन यासंदर्भात सुधारणा करण्यासाठी 9 मार्च रोजी केंद्र सरकारला लेखी विनंती केल्याचे आणि याबाबत पाठपुरावा केला जाईल, असे स्पष्ट केले.

NCERT Books
Rohit Pawar | अजित पवार विमान अपघातप्रकरण: पायलटला बळीचा बकरा बनवले जात आहे; रोहित पवारांचा आरोप

विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

राज्यमंत्र्यांच्या उत्तराला हरकत घेत विरोधी बाकांवरील आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. यावेळी राज्यमंत्री आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. या गोंधळात विरोधकांकडून ‌‘छत्रपती शिवाजी महाराज की जय... जय भवानी, जय शिवाजी...‌’ अशा घोषणा देण्यात आल्या. अखेर, या गोंधळात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हस्तक्षेप करत विरोधकांना शांत राहण्याचे आणि मंत्र्यांना फक्त नकाशापुरते बोलण्याची सूचना केली. त्यानंतर या वादावर पडदा पडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news