Chandrashekhar Bawankule | शिक्षकांना नोकरीतून काढण्याच्या धमक्या देणाऱ्यांची चौकशी करणार : चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती शिक्षक मतदारसंघात काँग्रेसकडून संस्था चालकांमार्फत दबाव, बावनकुळे यांचा आरोप
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule Pudhari
Published on: 
Updated on: 

Amravati Teacher Constituency Elections

नागपूर : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसला मतदान न केल्यास शिक्षकांना नोकरीतून काढण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. या तक्रारींची योग्य वेळी चौकशी करण्यात येईल. शिक्षकांना धमकावून मतदान मिळवण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा महसूलमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी (दि.१९) प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.

शिक्षण संस्थांना सरकारकडून अनुदान मिळत असताना काही संस्थांमधील व्यक्तींकडून शिक्षकांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. शिक्षकांनी कोणत्याही धमकीला न घाबरता, पारदर्शकपणे आणि आपल्या इच्छेनुसार मतदान करावे. शिक्षकांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले

शिवाजी शिक्षण संस्थेबाबत भूमिका स्पष्ट करताना बावनकुळे म्हणाले, मी शिवाजी शिक्षण संस्थेचे नाव घेतले नव्हते. या संस्थेबद्दल मला पूर्ण आदर आहे. मी स्वतः या संस्थेचा विद्यार्थी आहे. संस्थेचे काम मोठे करण्यात आमचेही योगदान राहिले आहे. मात्र, संस्थेच्या पदाचा किंवा नावाचा राजकीय स्वार्थासाठी गैरवापर होत असेल, तर त्याला आमचा आक्षेप आहे.

Chandrashekhar Bawankule
Amravati Teacher Constituency Election : महायुतीत बंडखोरी, मविआत फूट; २६ उमेदवारांमुळे चुरशीची लढत

महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेने त्यांच्या आदर्शांचे पालन करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. संस्थेतील काही व्यक्ती काँग्रेसला मतदान करण्यासाठी शिक्षकांना धमकावत असल्याच्या तक्रारी आल्या असून, त्यांची चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

शिक्षकांना नोकरीतून काढण्याची धमकी देणे चुकीचे आहे. अशा प्रकारांना संस्थेचा अधिकृत निर्णय समजू नये. संस्थेच्या नावाखाली काही व्यक्ती गैरवापर करत असतील, तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मी संस्थेचे नाव घेतले नसताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि हर्षवर्धन देशमुख यांना एवढे का लागले, असा प्रश्नही बावनकुळे यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्रातील पाचही जागा जिंकण्याचा विश्वास

नागपूर पदवीधर मतदारसंघासह महाराष्ट्रातील पाचही विधान परिषद जागांवर महायुतीचा विजय होईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

अमरावती येथील शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवणाऱ्या बंडखोर उमेदवारावर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती आपण केली.

Chandrashekhar Bawankule
Amravati Teachers Constituency Election | अमरावती शिक्षक निवडणुकीत बंडखोरी : शेखर भोयर, संगीता शिंदे, पवार यांची भाजपमधून हकालपट्टी

मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काँग्रेस नेते सुनील केदार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या मुद्द्यावर बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात आपण पोलीस अधीक्षकांना माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले.

संजय राऊत यांच्यावर टीका करताना बावनकुळे म्हणाले, संजय राऊत यांनी आपली उंची बघून बोलावे. देवेंद्र फडणवीस हे देशातील महत्त्वाच्या मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत. त्यांना कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही.

दुष्काळ निवारणासाठी काटकसरीचे आदेश

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीवर बोलताना बावनकुळे म्हणाले की, आपल्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने दुष्काळ निवारणासाठी आवश्यक सूचना दिल्या आहेत. दुष्काळी उपाययोजनांवर अधिक प्रभावीपणे खर्च करण्यासाठी काटकसर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विकासासाठी एखाद्या रस्त्याचे काम काही काळ पुढे ढकलावे लागले, तरी चालेल; मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या परवडणार नाहीत. शेतकऱ्यांना मदत करणे ही आमची प्राथमिकता आहे. चारा आणि पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

जलसंधारण, पाणीसाठा वाढविणे आणि जुन्या विहिरींचे पुनर्विकास यावर सरकार भर देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Chandrashekhar Bawankule
Amravati Teachers Constituency Election | अमरावती विधान परिषद निवडणूक : 'वंचित'च्या उमेदवाराचा अर्ज बाद

कोणतीही योजना बंद होणार नाही

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारी योजनांना कात्री लावली जाणार का, या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले की, कोणतीही योजना बंद केली जाणार नाही. मात्र, योजनांच्या अंमलबजावणीत आवश्यक सुधारणा करून अनावश्यक खर्च टाळता येऊ शकतो. त्यातून वाचणारा निधी दुष्काळ निवारणासाठी वापरणे हा सरकारचा उद्देश आहे.

राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, या देशात मतचोरी होऊ शकत नाही. देशात निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडते. जनतेने चोरांना मतदान करणे बंद केले आहे, हे त्यांनी तपासून पाहिले पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news